Russia-Ukraine War Live Updates: युक्रेनमध्ये युद्धामुळे तणाव स्थिती कायम असतानाच आता एक मोठी दुर्घटना घडली आहे (Russia-Ukraine War Live Updates). हेलिकॉप्टर कोसळून (helicopter crash) 16 प्रवासी ठार झाले आहेत. मृतांमध्ये गृहमंत्री (Home Minister) आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये (Kyiv) ही हेलीकॉप्टर दुर्घटना घडली आहे. बुधवारी सकाळी कीव जवळील ब्रोव्हरी येथे नर्सरी शाळेजवळील निवासी इमारतीवर हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांकडून मिळाले आहे.
वृत्तसंस्था 'एएफपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, कीव जवळील ब्रोव्हरी येथे नर्सरी शाळेजवळ बुधवारी हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर कोसळले त्यावेळी शाळेत आणि इमारतीजवळ मोठी वर्दळ होती. नॅशनल पोलिस प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी दिली आहे. या भीषण अपघातात 2 मुलांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की (वय-42) यांच्यासह गृहमंत्रालयातील अनेक महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.डेनिस मोनास्टिर्स्की यांनी सन 2021 मध्ये यूक्रेनच्या गृहमंत्रिपदी नियुक्ती झाली होती.
#BreakingNews | 16 people including Ukraine's interior minister and other senior officials killed when a helicopter crash in a suburb outside Kyiv, reports National Police Chief pic.twitter.com/ADHjxRcXud
— DD News (@DDNewslive) January 18, 2023
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनची राजधानी कीवपासून 20 किलामीटर अंतरावर असलेल्या ब्रोवैरी परिसरात बुधवारी हेलिकॉप्टर क्रॅश झाले. हेलिकॉप्टर कोसळतात त्यात भीषण आग लागली आणि त्यात 16 जणांचा होळपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत 10 लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.