Bride marry father in law : लग्न म्हटलं की गोंधळ, नाराजीशिवाय पूर्ण होतं नाही. आपण अनेक वेळा पाहिलं आहे, लग्न मंडपात जेवण्यावरुन या अजून कुठल्या कारणावरुन वादावादी भांडण होतात. लग्नात कधी वरमाळ आणायची राहिली म्हणून गोंधळ होतो. तर कधी वधूचे जोडवे कुठल्या बॅग ठेवले हेच आठवतं नाही, म्हणून तारांबळ होते. पण एका लग्नातील गोंधळामुळे म्हणा की चुकीमुळे वधूचं नवऱ्यासोबतच वराच्या वडिलांशीही लग्न झालं. (sasur bahu ki shadi)
अगदी बरोबर ऐकलं तु्म्ही हे विचित्र लग्न झालं (daughter in law Father In Law wedding) आहे, ऑस्ट्रेलियामध्ये...या शहरातील लोकप्रिय ब्रेकफास्ट रेडिओ शो 'फिट्झी अँड विप्पा विथ केट रिची'वर एका महिलेने तिच्या लग्नाची विचित्र गोष्ट सांगितल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. (Bride Marries Father In Law And Husband wedding mistake viral news today Trending News on google)
ते झालं असं की, या शोवर तिने सांगितलं की, तिने आणि त्याचा भावी नवऱ्याने कोर्ट मॅरेज करण्याचं ठरवलं. कोर्ट मॅरेज म्हटलं की साक्षीदार लागतात. आता त्यांना दोन साक्षीदारांची गरज होती. अशावेळी वर आणि वधूची आई साक्षीदार म्हणून सही करणार होते. पण ऐनवेळी वराचे वडील साक्षीदार म्हणून आले.
आता कोर्टात वधू वरासह साक्षीदार पोहोचले. वकिलासमोर कागदपत्रावर वर आणि वधूने सह्या केल्या. आता वेळ होती साक्षीदारांना सह्या करण्याची. वधूच्या आईने सही केली आणि वराच्या वडिलांनीही सही केली. पण जेव्हा कागदपत्र पाहण्यात आले तर मोठी चूक घडली होती. हा लग्नातील सर्वात मोठा गोंधळ झाला होता.
वराच्या वडिलांनी जिथे नवऱ्याची सही केली जाते तिथे सही केली होती. त्यामुळे या कागदपत्रानुसार या वधूचे दोन जणांशी लग्न झाले. एक त्या तरुणाशी आणि त्याचा वडिलांशी. वधू त्या व्यक्तीची सून ऐवजी पत्नी झाली. लग्नातील या गोंधळाने सर्वांच हैराण झाले. या वधूचं नाव किम आहे. रेडिओवरही तिच्या लग्नातील हा गोंधळ ऐकून सर्व आश्चर्यचकित तर झालेच शिवाय त्यांना हसूदेखील आवरलं नाही.
पुढे किमने सांगितलं की, तिच्या सासऱ्यांनी लग्नाच्या सर्टिफिकेटवर सही केली होती. लग्नाच्या लीगल पेपर्सवर नाही. त्यामुळे वराचे वडील त्या वधूचे सासरेच आहे, पती नाही. लग्नातील एवढा मोठा गोंधळ ऐकून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.