Trending: गुगल डूडलवरील ही टेस्टी आणि स्विट बबल टी आली तरी कुठून?

Bubble Tea: कोविडचा मोठा उद्रेक झालेला असताना सगळीकडेच लॉकडाऊन (Lockdown Recipes) होत तेव्हा त्यावेळेला अनेकांच्या घरी नवनवीन खाण्यापिण्याचे पदार्थ ट्राय केले गेले. या काळात तुम्हीही असेच अनेक पदार्थ ट्राय केले असतीलच. 

Updated: Jan 29, 2023, 03:40 PM IST
Trending: गुगल डूडलवरील ही टेस्टी आणि स्विट बबल टी आली तरी कुठून?  title=

Bubble Tea: कोविडचा मोठा उद्रेक झालेला असताना सगळीकडेच लॉकडाऊन (Lockdown Recipes) होत तेव्हा त्यावेळेला अनेकांच्या घरी नवनवीन खाण्यापिण्याचे पदार्थ ट्राय केले गेले. या काळात तुम्हीही असेच अनेक पदार्थ ट्राय केले असतीलच. या काळात तुम्हाला डालगोना कॉफी आणि बबल टी (Dolgona Coffee) आठवत असेलच. सध्या त्यातीलच ही एक बबल टी गुगलनं तुमच्यासाठी परत आणली आहे. तुम्ही तुमचा मोबाईल उघडलात आणि गुगलवर काहीतरी सर्च करायला उघडलं असेल तर गुगलवर तुम्हाला एक डुडल दिसेल (Goodle Doodle) त्यावर बबल टी म्हणून एक गोष्ट दिसेल तर ती सध्या खूप जास्त व्हायरल होताना दिसते आहे. नक्की ही बबल टी आहे तरी काय? ती बनवतात तरी कशी आणि त्यातून नक्की ही बबल टी आली तरी याबद्दलची इंटररेस्टिंग गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. (bubble tea google doodle today goes viral see what is the importantance)

तुम्ही लॉकडाऊनमध्ये डालगोना कॉफी तर ट्राय केली असेलच तेव्हा त्याची रेसिपी तुम्ही किती तरी लोकांना विचारली असेल आणि त्यातून तुम्हीही ती आवडीनं ट्राय केली असेलच. तेव्हा त्या ट्रेण्डमध्ये आलेली अजून एक रेसिपी होती ती म्हणजे बबल टी. या बबल टीनंही (Viral Bubble Tea) सगळीकडेच धुमाकूळ घातला होता. ही रेसिपी कदाचित काही जणांना माहितीही नसेल. बबल टीमध्ये तुम्हाला बबल्स तर दिसतीलच परंतु त्यातूनही बबल टी बनावयची ट्रीक काय हेही तुम्हाला कळेच. 

आज या बबल टीचा एकप्रकारे बर्थडेचं आहे त्यामुळे गुगलनं या बबल टीचा आज बर्थडे सेलिब्रेट (Bubble Tea Celebrates) करण्यासाठी हे गुगल डूडल तयार केले आहे. त्यामुळे ही बबल टी सध्या सगळीकडेच लोकप्रिय होते आहे आणि बबल टी सध्या पुन्हा एकदा ट्रेण्डमध्ये आली आहे. बबल टीला पर्ल टी (Pearl Tea) असंही म्हणतात. यामध्ये अनेक फ्लेवर्सही आहेत. टॅंजी आणि फ्रुटी किंवा स्विट आणि मिल्की (Milky) असेही या बबल टीचे हे काही फ्लेवर्स तुम्हालाही आकर्षित करतील असं गुगलनं आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, आजचा दिवस हा गुगलनं बबल टी साजरा करण्यासाठी ठेवला आहे. ज्यात बोबा टी, पर्ल टीही तुम्ही त्याला म्हणून शकाल. हनीड्यू, मॅचा, रास्पबेरी (Raspberry) आणि मोचा अशा विविध आणि टेस्टी  पद्धतीच्या या बबल टीज आहेत. फ्रूट जेली आणि टॅपिओकामध्ये तुम्ही या बबल टी बनवू शकता, असंही गुगलनं त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. 

बबल टी हा एक तैवानचा पदार्थ आहे. या बबल टीच्या लोकप्रियेतत भरही झाला आहे. ही एक तिथली चहा संस्कृती आहे. जी 17 व्या शतकापासून सुरू झाली आहे. 1980 नंतर या चहामध्ये बरेच बदलही करण्यात आले आहेत. त्यात नवीन फ्लेवर्स आणि एडिशन्सही (Flavours) आल्या आहेत. ही टी सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरियाच्या (South Korea) देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. आता भारतातही या बबल टीनं लोकप्रियता मिळवलेली आहे.