नवी दिल्ली : पश्चिम आशियातील देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलीस्तीनला पोहोचणार आहेत. या देशाची यात्रा करणारे पंतप्रधान मोदी पहिले पंतप्रधान आहेत.
या दौऱ्याआधी पहिल्या दिवशी पीएम मोदी जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये पोहोचले. त्यानंतर आज ते फिलीस्तीनला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमीरात पोहोचले. यामुळे एक दिवस आधी शुक्रवारी प्रसिद्ध इमारतीवर भारतीय तिरंगांच्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.
Dubai: Burj Khalifa, Dubai Frame & ADNOC headquarters lit up in Indian flag colours ahead of Prime Minister Narendra Modi's visit to UAE (Pictures credit- Navdeep Suri, Ambassador of India to the UAE) pic.twitter.com/e3NWdOEC7u
— ANI (@ANI) February 10, 2018
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा तिरंग्याच्या रंगात आहे. शनिवार संध्याकाळी मोदी अबू धाबीला पोहोचणार आहेत. तेथे त्यांचं औपचारिक स्वागत होईल. यानंतर ते अबू धाबीमध्ये क्राउन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतील.
लष्कराचे डेप्युटी सुप्रीम कमांडर आणि अबू धाबीचे क्राउन प्रिंस पीएम मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यानंतर काही करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. रविवार पीएम मोदी दुबईमध्ये आयोजित वर्ल्ड गर्वंमेंट समिटमध्ये भाग घेतील. ज्यामध्ये भारत प्रमुख अतिथी आहे. पंतप्रधान मोदी तेथील पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची देखील भेट घेतील.