नवी दिल्ली : नववर्ष २०१८ च्या स्वागताचे वेध अख्ख्या जगाला लागले आहेत. जगभरात सगळीकडेच २०१८ वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.
पूर्वेकडच्या न्यूझीलंडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नववर्षाचं जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं.
सिडनीतील जगप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी करत नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
न्यूझीलंडमधल्या ऑकलंड शहरातल्या स्काय टॉवरवर नववर्षाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीनं करण्यात आलं. आधी काऊंटडाऊन आणि त्यानंतर न्यूझीलंडमध्ये बरोबर रात्री बारा वाजताच्या ठोक्याला डोळ्यांचं पारणं फेडणारी रंगीबेरंगी आतशबाजी केली गेली.
सोबतच सर्वांनीच एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारालाच न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत केलं गेलं.
जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषाने स्वागत होतंय. फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रोषणाईनं सरत्या वर्षाला निरोप देत नवं वर्षांचं स्वागत केलं जातंय.
नव्या आशा, आकांक्षा घेऊन येत असलेल्या नववर्षाच्या स्वागतासाठी पश्चिमेकडच्या देशांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.