Chai Ice Cream चा व्हिडीओ पाहून यूजर्स संतापले, नरकात मिळेल शिक्षा...; Viral video

Chai Ice cream Video: चहा म्हणजे केवळ साखर, चहा पावडर आणि दुधाचे उकळते मिश्रण नव्हे, त्यापलीकडेही चहाचे चविष्ट प्रकार आहेत. 

Updated: Nov 7, 2022, 03:22 PM IST
Chai Ice Cream चा व्हिडीओ पाहून यूजर्स संतापले, नरकात मिळेल शिक्षा...; Viral video  title=

Bizarre Food Combination: गेल्या काही वर्षभराच फ्युजन फूडचा ट्रेंड ( trend of fusion food) जोर धरू लागला आहे. अनेक फूड ब्लॉगर्सनी बाजारात किती विचित्र पण मनोरंजक फूड कॉम्बिनेशन्स उपलब्ध आहेत हे दाखवून दिले आहे. असे अनेक व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर लोक संतापतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याला पाहून लोक संतापले आहेत. 

नुसत्या नावाच्या उच्चारानेच आपल्याला तरतरीत करणारं पेयं म्हणजे चहा (Tea lovers). भारतीयांचीच नव्हे तर जगभरातल्या अनेकांची सकाळ चहाच्या वाफळत्या पेल्याशिवाय अशक्य आहे. चहाशिवाय सकाळ म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशीच भाववस्था. या महात्म्यामुळेच पाण्याच्या खालोखाल लोकप्रिय ठरलेले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पेय आहे. मात्र चहाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामुळे चहाप्रेमींकडून संताप व्यक्त केला आहे. चहापासून बनवलेल्या फूड कॉम्बिनेशनचा व्हिडिओ सध्या व्हायरल (video viral) होत आहे. 

वाचा : विराट कोहली बाबत मोठी बातमी! 

चहामध्ये मिसळलेले आइस्क्रीम

एका यूजरने धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केला आहे. चहा आणि आईस्क्रीमचे मिश्रण केले आहे. चहाच्या चवीचे आइस्क्रीम रोल इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. जे नवीन विचित्र खाद्य संयोजन आहे. Mi_nashikkar ने फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक विक्रेता बर्फाच्या तव्यावर गरम चहाचा कप ओतताना दिसत आहे. तो त्यात दूध आणि चॉकलेट सिरप घालतो. थोड्या वेळाने, विक्रेता आईस्क्रीमसह चहा ओतून रोल बनवतो. तो चहाचा आईस्क्रीम रोल खरडतो आणि चॉकलेट सिरप टॉपिंग ओततो.

 चहाप्रेमींची संतप्त प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 8 लाखांहून अधिक प्रतिक्रिया चहाप्रेमींकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत. आइस्क्रीम रोल्स ही थायलंडची गोड डिश आहे. थाई डेझर्टवर हे देसी आइस्क्रीम ट्विस्ट कोणत्याही डिशइतकेच फ्यूजन आहे. मात्र, भारतीय प्रेक्षक या अनोख्या स्वादिष्ट पदार्थाने प्रभावित झाले नाहीत. 'चाय आइस्क्रीम'ला उत्तर देताना त्यांनी एका डिशमध्ये अनेक फ्लेवर्स मिसळण्याची गरज असल्याची टीका केली.