चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर

गलवान खोऱ्यात (Galvan Valley) भारतीय सैन्याबरोबर झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले होते. मात्र यावर चीननं पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

Updated: Feb 20, 2021, 09:54 PM IST
चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात (Galvan Valley) भारतीय सैन्याबरोबर झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले होते. मात्र यावर चीननं पहिल्यांदाच भाष्य केले आहे. पाच सैनिक मारले गेल्याचं म्हटलंय. चीनचा खोटारडेपणा (China’s hypocrisy) पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. दरम्यान, दोन्ही देशा दरम्यान कमांडर स्तरावर चर्चेची दहावी फेरी होत आहे. (China’s hypocrisy: Creating a new narrative through Western Media)

गेल्यावर्षी जून महिन्यात लडाखच्या गलवान खो-यात भारत आणि चीनच्या सैनिकांची जोरदार झटापट झाली. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. चीननं मात्र त्यांचे नेमके किती जवान मारले गेले, हे कधीच जाहीर केलं नाही. अखेर 8 महिन्यांनी चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्रानं गलवानमध्ये एका अधिकाऱ्यासह 5 सैनिक मारले गेल्याचं म्हटलंय. मात्र सैनिक मारले गेल्याची कबुली देताना चीननं पुन्हा एकदा खोटारडेपणा केलाय.

जगभरातील अनेक देश, रशियाची 'तास' ही मीडिया एजन्सी चीनचे किमान 45 सैनिक मारले गेल्याचं सांगत असताना केवळ 5 जण ठार झाल्याचं सांगून लपवाछपवी सुरूच ठेवलीये.. या वृत्तपत्रानं झटापटीचा एक व्हिडिओदेखील जारी केलाय... या व्हिडीओत दिसणारा क्युई फबाओ हा रेजीमेंट कमांडर गलवानमध्ये मारला गेल्याचा दावा ग्बोबल टाईम्सनं केला आहे. 

भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला तणाव आता निवळतोय. १० फेब्रुवारीपासून पँगाँग लेक परिसरातून दोन्ही सैन्य मागे हटतायत. अशा वेळी चिनी वृत्तपत्रानं दिलेली ही कबुली महत्त्वाची मानली जात असली तरी नेहमीच्या सवयीप्रमाणे हातचं राखून ठेवलंच आहे... जनतेला नेमके किती सैनिक मारले गेले हे समजू नये आणि जगात आपली नाचक्की होऊ नये, यासाठी तिथल्या हुकुमशाही सरकारचा आटापिटा सुरूच आहे. 

एखाद्या व्यक्तीला सिनेमा पाहायचा छंद असतो. तर एखाद्याला भटकतींची आवड असते. किंवा आणखी कोणी इतर कशात तरी रमतो. आता आम्ही तुम्हाला रशियामधल्या अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, जिची इच्छा समजल्यानंतर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.