मुंबई : चीनमध्ये कोरोना व्हॅक्सीन तयार केली जात असून सामान्यांसाठी नोव्हेंबरमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल ऍण्ड प्रीवेंशनच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रॉयटर्स रिपोर्टनुसार, चीनने ४ कोरोना व्हॅक्सीन क्लिनिकल ट्रायलमधून अंतिम टप्प्यात आहेत.
अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या लोकांसाठी चीनने या अगोदरच तीन कोरोना व्हॅक्सीनची परवानगी दिली आहे. ही परवानगी 'एमरजेंसी यूज प्रोग्राम'च्या अतंर्गत दिली आहे. या प्रोग्रामची सुरूवात जुलै महिन्यातच झाली होती.
China coronavirus vaccine may be ready for public in November: official https://t.co/IzE9BMYTjv pic.twitter.com/F0LPl3rQIj
— Reuters (@Reuters) September 15, 2020
चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एण्ड प्रीवेंशनच्या बायोसेफ्टी एक्सपर्ट गुइझेन वूने सोमवारी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, व्हॅक्सीनचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अगदी सहज होत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत अगदी सहज हे व्हॅक्सीन सामान्यांसाठी उपलब्ध होईल.
गुइझेन वू ने हे देखील सांगितलं की, त्यांनी स्वतः एप्रिल महिन्यात व्हॅक्सीन टोचून घेतली होती. मात्र त्यांनतर त्यांना काहीच त्रास जाणवला नाही. मात्र त्यांनी कोणती लस टोचली होती हे मात्र सांगितलं नाही.