चीन सैन्यातून तीन लाख सैनिकांची कपात, हे आहे कारण

चीनने सोमवारी त्यांच्या २३ लाख सैनिक संख्या असलेल्या पिपुल्स लिबरेशन आर्मीमधील तीन लाख सैनिक कमी केले आहेत.

Updated: Mar 6, 2018, 09:29 AM IST
चीन सैन्यातून तीन लाख सैनिकांची कपात, हे आहे कारण title=

बीजिंग : चीनने सोमवारी त्यांच्या २३ लाख सैनिक संख्या असलेल्या पिपुल्स लिबरेशन आर्मीमधील तीन लाख सैनिक कमी केले आहेत.

आता त्यांच्याकडे २० लाख सैनिक राहिले आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या सेनेला आधुनिक युद्धनितीने सक्षम करणे हा यामागचा उद्देश सांगितला जात आहे. 

चीनमध्ये आता केवळ २० लाख सैनिक

चीनचे पंतप्रधान ली केकियांगने नॅशनल पिपुल्स कॉंग्रेसला सोपवण्यात आलेल्या वार्षिक कार्य रिपोर्टमध्ये याची घोषणा केली. ली म्हणाले की, सेनेच्या जवानांच्या संख्येत तीन लाखांची कपात करण्यात आली आहे. 

या सैनिकांची केली कपात

चीन सेनेचं अधिकृत वृत्तपत्र पीएलए डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, अशा जवानांची संख्या कमी आहे जे सैनिक युद्धात सहभागी होत नाहीत. वर्ष १९८० मध्ये पीएलमद्ये ४५ लाख सैनिक होते. याआधी १९८५ मध्ये सैनिकांची कपात करण्यात आली होती. तेव्हा सैनिकांची संख्या ३० लाख इतकी होती नंतर या सैनिकांची संख्या २३ लाख झाली होती.