चीनमधील 'ही' एक गोष्ट आकर्षणाचा विषय, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

सोशल मीडियावर चीन पु्न्हा चर्चेत 

Updated: Jun 9, 2021, 07:23 AM IST
चीनमधील 'ही' एक गोष्ट आकर्षणाचा विषय, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

मुंबई : चीनमधील प्रत्येक गोष्ट ही धक्कादायक असते. सध्या संपूर्ण जगाला चीनमधून बाहेर पडलेल्या कोरोना संक्रमणाने वेढीस धरलं आहे. असं असताना एक अजब गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे पु्न्हा एकदा चीन चर्चेत आलं आहे. (China wandering elephants becoming international stars) चीनमध्ये भटकणारा एक हत्तींचा कळप जागतिक स्तरावर आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला आहे. 

हत्तींचा हा कळप ट्विटर आणि युट्यूबवर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टार बनला आहे. जंगली हत्तींचा हा कळप कुनमिंगच्या बाहेरच्या परिसरात आपल्या घरापासून 500 किमीपर्यंतचा प्रवास केला आहे. महत्वाचं म्हणजे कळपाला शहरापासून लांब ठेवण्याची जबाबदारी ज्या ट्रॅकिंग अधिकाऱ्यांकडे आहे ते देखील हैराण झाले आहे. 

चीनच्या वीबो नावाच्या मायक्रोब्लॉगिंवर हे हत्ती गेल्या कित्येक दिवसांपासून ट्रेंड होत आहेत. यावरून यांच्या प्रसिद्धीचा अंदाज आपण लावू शकतो. या हत्तींच्या कळपाचा झोपलेला फोटो सोमवारी 25 हजारवेळा पोस्ट झाला असून तब्बल 20 करोड लोकांनी पाहिला आहे. ह्यूस्टन पल्बिक मीडियाच्या बातमीनुसार, या हत्तींनी आपलं घर सोडून तब्बल एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. 

हे हत्ती जिशुआंगबन्नी सीमेवर एका रिझर्वमध्ये राहत आहेत. आता हे हत्ती जंगल आणि नद्या पार करत चक्क गावात आणि शेतात पोहोचले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या हत्तीच्या कळपाने भरपूर नुकसान गेलं असून युवा हत्तीने रस्त्यावरी खराब झालेलं अन्न खाल्लं. जे दारू बनवण्यासाठी वापरलं जातं. यानंतर नशेत असलेल्या या हत्तीने खूप उत्पात मांडला. यामुळे खूप नुकसान झालं. कुनमिंग शहरात तब्बल 70 लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. यामुळे या हत्तींच्या कळपाला मानवी वस्तीपासून दूर करणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

सोईंकरता सोडलं आपलं घर 

अभ्यासकांच्या माहितीनुसार, हत्तीच्या या कळपाने सोई-सुविधांसाठी आपलं घर सोडलं आहे. आता ते योग्य जागा मिळाल्यावरच थांबतील. हे हत्ती सुरक्षा आणि सेक्सकरता योग्य वातावरणाच्या शोधात आहेत. हत्ती धोक्यापासून लांब जातात. तसेच खाण्यापिण्याच्या शोधात ते बाहेर पडले आहे. सामाजिक कारण आणि प्रजनन हे हत्तीच्या पलनाचे मुख्य कारण आहे. 

आतापर्यंत केलं एवढं नुकसान 

पाणी आणि अन्नाच्या शोधात हे हत्तीचं कळप भटकत आहे. यांनी अनेक मानवी वस्तींना धोका निर्माण केला आहे. मात्र अद्याप कोणतीच जीवितहानी झालेली नाही. 10 लाखाहून अधिक नुकसान झालं आहे. कळपाकरता योग्य जागा न मिळाल्यामुळे यांचा प्रवास सुरूच आहे.