'बाळ नाही झाल्यास द्यावा लागणार टॅक्स'

 लोकसंख्येतील असंतुलन पाहता नवं फर्मान जारी करण्यात आलंय. 

Updated: Aug 17, 2018, 11:20 PM IST
'बाळ नाही झाल्यास द्यावा लागणार टॅक्स' title=

बिजींग : जनसंख्येचा विस्फोट पाहता १९७० मध्ये चीनमध्ये एक बाळ निती लागू करण्यात आली होती. पण लोकसंख्येतील असंतुलन पाहता नवं फर्मान जारी करण्यात आलंय. जन्म दर वाढण्यासाठी चीनी संस्थेने एक अजब फतवा काढलायं. चीनमध्ये तरुणांच्या तुलनेत वृद्धांची संख्या जास्त आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार कोणत्या दाम्पत्याकडे दोन बाळ आहेत किंवा एकही बाळ नाहीए त्यांना मेटरनिटी रक्कम द्यावी लागेल.  एका दशकापासून चीनमध्ये एक बाळ निती सुरू आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश वृद्धांच्या वाढत्या संख्येने त्रस्त आहे.

चहूबाजू टीका 

चाळीसपेक्षा कमी वयाचे दाम्पत्य ज्यांच्याकडे दोन बाळ नाही त्यांना निश्चित टॅक्स द्यावा लागेल. शिन्हुआ एजंसीच्या हवाल्याने हे वृत्त समोर आलंयं जर कोणत्या परिवाराकडे दोनपेक्षा अधिक बाळ असतील त्यांना जमा केलेली रक्कम मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. तर दूसऱ्या एका संस्थेनेही घोषणा केली. त्यानुसार दोनहून कमी बाळ असलेले पालक रिटायर्टमेंटवेळी रक्कम पुन्हा घेऊ शकतात. या घोषणेवर चहूबाजूने टीका होत आहे.