अमेरिकेसह जगावर कोरोनाचे संकट, आतापर्यंत ३८ हजार नागरिकांचे बळी

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिव वाढ होत आहेत. जगभरात कोरनाच्या रुग्णांची संख्या आता ७ लाख ८३ हजार इतकी झाली आहे. 

Updated: Mar 31, 2020, 10:06 AM IST
अमेरिकेसह जगावर कोरोनाचे संकट, आतापर्यंत ३८ हजार नागरिकांचे बळी title=
संग्रहित छाया

वॉशिंग्टन : कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिव वाढ होत आहेत. जगभरात कोरनाच्या रुग्णांची संख्या आता ७ लाख ८३ हजार इतकी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३८ हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.अमेरिकेत कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे.. नव्यानं समोर आलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत ३ हजार ८जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.

अमेरिकेत १ लाख ६३ हजार ४२९ नागरिकांना कोरोनाची लगाण झालीये.. इटली, स्पेन आणि चीनशी तुलना करता ही आकडेवारी या सर्वांपेक्षा कितीतरी अधिक आहे..  अमेरिकेत कोरोनानं हाहाकार माजवलाय. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढिल 30 दिवस नागिरांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सध्या काळा आपल्या सर्वांसाठीच परीक्षेचा काळ असल्याचंही ते म्हणालेत. 

तैवानचा गंभीर आरोप

तैवाननं दिलेल्या सूचना WHOनं कुणाला सांगितल्या नाहीत, असा गंभीर आरोप तैवाननं केलाय. कोरोनाचं संकट तैवाननं कधीच ओळखलं होतं आणि त्यावर उपाययोजनाही केल्या होत्या.. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात तैवानला यश आलं होतं यासाठी तैवानची प्रशंसाही करण्यात आली.. मात्र चीनच्या दबावामुळे WHOनं तैवाननं केलेल्या सूचना इतर राष्ट्रांपर्यंत पोहोचवल्या नाहीत असा आरोप तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जोआना आऊ यांनी केला आहे. WHOनं तैवानवर लादलेल्या प्रतिबंधांचाही विचार करावा असंही जोआना आऊ यांनी म्हटले आहे.

 कोरोना चाचणीचे टेस्ट कीट निकृष्ट?

चीनमधून इतर देशामध्ये पाठवले जाणारे मास्क हे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी स्पेनने चीनमधून आलेले कोरोना चाचणीचे टेस्ट कीट परत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नेदरलँडनेही अशाप्रकारचा निर्णय मास्कसंदर्भात घेतला आहे. नेदरलँडमध्ये चीनमधून आयात करण्यात आलेले मास्क हे दर्जा मानकांची पूर्तता करणारे नसल्याचे चाचण्यांमधून निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच हे मास्क वितरित न कऱण्याचा निर्णय नेदरलँडमधील यंत्रणांनी घेतला आहे.

स्वत:ला करुन घेतले क्वारंटाईन 

एका सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि त्यांचे सल्लागार यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. ७० वर्षीय नेत्यानाहू यांना कोरोनाचा लागण झाली की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यांची तपासणी झाली असून आरोग्य खात्याकडून अद्याप तपासणीचा अहवाल आलेला नाही... मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नेत्यानाहूंनी तसंच त्यांच्या सल्लागारांनी स्वताला क्वारंटाईन करुन घेतलंय. 

इंडोनेशियात कोरोनाचा प्रार्दुभाव 

इंडोनेशियामध्येही कोरोनाचा प्रार्दुभाव वेगाने होऊ लागला आहे. इंडोनेशीयामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १२९वर गेली आहे. परिस्थीती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच नागरिकांवर सुरक्षित अंतराच्या नियमांची सक्ती करण्याचे आदेश  इंडोनेशीच्या राष्ट्रपतींनी पोलिसांना दिलेत. 

नायजेरिया : १४ दिवसांचा लॉकडाऊन

कोरोनाला रोखण्यासाठी नायजेरीच्या सरकारनंही आता लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. अबूजा आणि लागोस या दोन शहरांमध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. सोमवारी याची घोषणा होताच नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केली.

स्पेन : ३१ जणांची कोरोना चाचणी

समुद्रात बुडणाऱ्या ३१ प्रवाशांना स्पेनच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी वाचवले. या सर्वांना सुखरुप बंदरावर नेण्यात आलं. मात्र त्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे का याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. मृत्यूच्या दाढेतून सुटका झाल्यानं या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.