अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरुच, रुग्णांची संख्या 25 लाखांवर

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढली

Updated: Jun 28, 2020, 02:25 PM IST
अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरुच, रुग्णांची संख्या 25 लाखांवर title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. अमेरिकेच कोरोना रुग्णांची संख्या 25,00,419 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 1,25,000 वर पोहोचली आहे. वृत्तसंस्था एएफपीने जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार ही माहिती दिली.

अमेरिकेतील कोरोनाचा कहर पाहता काही दिवसांपूर्वी अनलॉक झालेला काही भाग पुन्हा बंद करण्यात आला आहे. टेक्सास आणि फ्लोरिडामध्ये बार पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. टेक्सासच्या राज्यपालांनी शुक्रवारी सर्व बार बंद ठेवण्याचे आदेश दिले, तर फ्लोरिडामध्ये दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या दोन राज्यात कोरोनाची प्रकरणे कमी होती. पण आता येथे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने येथे पुन्हा दैनंदिन व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

अमेरिकेव्यतिरिक्त, कोरोनाचा संसर्ग संपूर्ण जगात दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत जगात कोरोनामुळे त्रस्त रूग्णांची संख्या 96 लाखांवर पोहोचली होती. तर आतापर्यंत सुमारे 4 लाख 90 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी लॅटिन अमेरिकन मेक्सिकोमध्ये कोरोना विषाणूची मृत्यूची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे. येथे 2 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. चार महिन्यांपूर्वी मेक्सिकोमध्ये कोरोना रुग्णाची पहिली नोंद झाली होती.

आकडेवारीनुसार, अमेरिका अजूनही सर्वाधिक प्रभावित देश आहे. आतापर्यंत येथे सुमारे 25 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1.25 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ब्राझील, रशिया आणि त्यानंतर भारतात आहेत. अमेरिकेनंतर ब्राझील, युनायटेड किंगडम आणि इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत जगात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या वाढली असून रुग्णांची संख्या एक कोटीवर गेली आहे.