नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली असून, आता हा आकडा ८० वर पोहचला आहे. ३०० हून अधिक रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्य़ंत १७ देश हे कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. नॅशनल हेल्थ कमीशनच्या माहितीनुसार अडीच हजार लोकांना याची लागण होण्य़ाची शक्यता आहे. दरम्यान, वुहान प्रांतात सहा दिवसांत रुग्णालय बांधण्यासाठी सरकारनं ४ कोटी ३५ लाख डॉलर्स जाहीर केले आहेत.
चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने एकच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, अमेरिका हेल्थ ऐजंसींच्या अहवालानुसार अमेरिकेत पाच कोरोना रूग्ण आढूळन आले आहेत. सध्या या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, चीनवरून सर्व प्रवाशांचं स्क्रिनिंग करण्यात येत आहे.
भारतामध्ये देखील कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरु आहेत. ही व्यक्ती चीनमधून एमबीबीएस करुन भारतात आला आहे.
कोरोना व्हायरस अमेरिकेत देखील पोहोचला आहे. अमेरिकेत ५ रुग्ण आढळून आले आहेत. पहिला व्यक्ती हा चीनच्या वुहान येथून अमेरिकेत आला होता. २६ राज्यांमधील १०० लोकांची तपासणी केली गेली. ज्यामधील ५ जण हे संशयित आढळून आले.