17 वेळा नाही तर तब्बल सतराशेवेळा फोन केला आणि... पोरीनं असं संपवल आईच्या बॉयफ्रेंडला

 या मुलीने आईच्या प्रियकराला(boyfriend) संपवून टाकले. पोलिस तपासात या मारेकरी मुलीने दिलेली कारण ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. अमेरिकेतील हे प्रकरण आहे. 

Updated: Nov 6, 2022, 06:35 PM IST
17 वेळा नाही तर तब्बल सतराशेवेळा फोन केला आणि... पोरीनं असं संपवल आईच्या बॉयफ्रेंडला title=

नवी दिल्ली : विवाह्यबाह्य संबधांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या तरुणाची हत्या(crime) दुसरं तिसरं कुणी नाही तर त्याच्या प्रेयसीच्या मुलीने केली आहे. या मुलीने आईच्या प्रियकराला(boyfriend) संपवून टाकले. पोलिस तपासात या मारेकरी मुलीने दिलेली कारण ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. अमेरिकेतील हे प्रकरण आहे. 

प्रियकर ब्लॅकमेल करत होता

साकिब हुसेन(वय 21 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. सकिबचे एका महिलेसह विवाहबाह्य संबध होते. मात्र, या तरुण याचा गैरफायदा घेत महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. साकिब या महिलेला वारंवार फोन करत होता. तसेच तिला अश्लिल व्हिडिओ पाठवून तिला त्रास देत होता. महिलेच्या मुलगी मेहक बुखारी ही गोष्ट समजली. यानंतर मेहकने साकिबची हत्या करण्याचा कट रचला. 

कारने धडक दिली

साकिब आपल्या कारने जात असताना मेहकने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याच्या कारचा दुसऱ्या एका कारने पाठलाग केला. मेहकने साकिब याच्या कारला धडक दिली. या धडकेत साकिब आणि त्याच्यासह असलेल्या त्याच्या एक मित्राचा मृत्यू झाला आहे. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसले. मात्र, पोलिस तपासादरम्यान धक्कादायक खुलासा झाला.

1700 वेळा फोन केला

साकिब आईला त्रास देत असल्याने मेहकने त्याच्या हत्येचा डाव आखला. यापूर्वी मेहकने अनेकदा साकिबला आईपासून दूर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, तो सातत्याने तिच्या आईला त्रास देत होता.  साकिबच्या अपघातानंतर पोलिसांना घातपाताचा संशय आला. यामुळ त्यांनी खोलवर तपास केला असता कॉल रेकॉर्डनुसार मेहकचे नाव समोर आले. मेहकच्या नंबरवरुन साकिबला तब्बल 1700 वेळा फोन आले होते. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. या नंतर साथीदारांच्या मदतीने सकिबची हत्या घडवून आणल्याचे मेकने कबूल केले.