गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून यायचा घाणेरडा वास, कारण कळताच बॉयफ्रेंडला आली चक्कर

काही दिवसांनंतर प्रियकराला त्याच्या मैत्रिणीच्या बाथरूममधून खूप उग्र वास येऊ लागला.

Updated: Mar 23, 2022, 02:56 PM IST
गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून यायचा घाणेरडा वास, कारण कळताच बॉयफ्रेंडला आली चक्कर  title=

मुंबई : हल्ली लग्नाअगोदरच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड लिव-इनमध्ये राहतात. अनेकांना जॉबमुळे लग्नासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड एकत्र राहणं पसंत करतात. लिव-इन या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने पाहिलं जात आहे. पेंसिल्वेनियामध्ये राहणाऱ्या ट्रेसी दौडस (Tracey Douds)ने आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याकरता एक घर खरेदी केलं. ती आणि तिचा प्रियकर त्या घरात राहत होते. 

गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून यायचा घाणेरडा वास 

'न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, प्रेयसीने घर विकत घेतले असले तरी प्रियकर त्याची काळजी घेत असे आणि सर्व कामे करत असे. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु काही दिवसांनंतर प्रियकराला त्याच्या मैत्रिणीच्या बाथरूममधून खूप उग्र वास येऊ लागला.

हा दुर्गंधी बहुतेक रात्री येत असे. त्यामुळे प्रियकराचे त्या घरात राहणे कठीण झाले. बॉयफ्रेंडला आश्चर्य वाटायचे की त्याची गर्लफ्रेंड रात्री काय करते, त्यामुळे तिच्या बाथरूममधून दुर्गंधी येते.

यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या बाथरूमची झडती घेतली. यामध्ये प्रियकराला वाटले की कदाचित प्रेयसीच्या बाथरूममध्ये काही प्राणी किंवा मांजर मरण पावले आहे, ज्यामुळे इतका तीव्र वास येत आहे.

हा प्राणी शोधण्यासाठी प्रियकराने प्लंबरला बोलावले. बाथरुममध्ये प्राण्याचा शोध सुरू केला असता उलगडलेलं रहस्य पाहून प्रियकराला घाम फुटला. तिच्या प्रियकराला बाथरूममधून काय मिळाले याची कल्पनाही तिने केली नव्हती.

बाथरूममध्ये खोदकाम केल्यानंतर धक्कादायक वास्तव्य समोर 

प्रियकराने प्रेयसीच्या बाथरूममध्ये थोडेसे खोदले असता तो घाबरून ओरडला. बाथरूमच्या फरशीखाली मानवी सांगाडा होता.

हे पाहून मैत्रिणीचाही विश्वास बसेना. माणसाचा मृतदेह तिथे पुरला होता. त्यानंतर तेथून प्रचंड दुर्गंधी येत होती.

यानंतर जोडप्याने तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तपास केला असता. मृतदेह तेथे खूप पूर्वी लपवून ठेवल्याचे समोर आले.

या घटनेनंतर गर्लफ्रेंडला धक्का बसला आहे. इतके दिवस ती सडलेल्या प्रेतावर आंघोळ करत होती यावर तिचा विश्वासच बसत नव्हता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x