यापुढे कुणाला मस्करीतही म्हणू नका 'टकल्या', तुमच्यावर दाखल होऊ शकतो गुन्हा

'टकल्या' म्हटलं म्हणून 'केस' झाली, पाहा नेमकं काय आहे प्रकरण

Updated: May 13, 2022, 07:30 PM IST
यापुढे कुणाला मस्करीतही म्हणू नका 'टकल्या', तुमच्यावर दाखल होऊ शकतो गुन्हा title=

World News : केस नसलेल्या एखाद्या व्यक्तीला मस्करीमध्ये सहजपणे टकल्या म्हटलं जातं. एवढंच नव्हे तर अनेकदा अशा व्यक्तींन हिणवण्यासाठीही हा शब्द वापरला जातो. पण आता मात्र हा शब्द उच्चारण्यापूर्वी  दोनदा विचार करा. कारण ब्रिटनच्या एका न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार आता कुणाला टकल्या म्हणणं म्हणजे त्याचा लैंगिक छळ आहे. आणि याला कारण ठरला आहे  ब्रिटनमधला टोनी फिन.

वेस्ट यॉर्कशायरमधील एका कंपनीत काम करणाऱ्या टोनी फीनला नोकरीवरून कमी करण्यात आलं होतं. याविरोधात दाद मागण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली. डेलीमेलच्या बातमीनुसार, टोनी फिनने कोर्टात अनेक दावे केले, त्यापैकी एक लैंगिक छळाचा होता. त्याने सांगितले की, एका घटनेदरम्यान त्याला कारखाना पर्यवेक्षक जेमी किंगकडून लैंगिक छळाचा सामना करावा लागला. 

जुलै 2019 मध्ये किंगने त्याला  'टकला' बोलून शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. या वादावर एका तीन सदस्यीय पॅनलने सखोल चर्चा केली.  पुरूषांचे केस स्त्रियांपेक्षा जास्त गळतात त्यामुळे एखाद्यासाठी या शब्दाचा प्रयोग करणं हे एकप्रकारचा भेदभावच आहे. 

पॅनेलनं यावर विचारविनिमय केला. टकल्या हा शब्द वापरल्यानं अपमान होतो की लेंगिक छळ या मुद्द्यावर चर्चा झाली आणि अखेरीस  टकला हा शब्द लेंगिकतेशी संबंधित असल्याचं म्हटलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x