UAE वर शोककळा, ४० दिवस दुखवटा, ३ दिवस कार्यालयं बंद

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कार्यालयातील कामकाजही पहिले 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे", अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्था डब्ल्यूएएमने दिली आहे.

Updated: May 13, 2022, 07:13 PM IST
UAE वर शोककळा, ४० दिवस दुखवटा, ३ दिवस कार्यालयं बंद  title=

अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल-नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al-Nahyan) यांचे शुक्रवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. अनेक वर्षांपासून ते आजाराशी झुंज देत होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत माळवली. (uae president sheikh khalifa bin zayed al nahyan dies 40 days of mourning 3 days of office closed)
 
"शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांचे निधन झाल्याने दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.  तसेच शुक्रवारपासून 40 दिवस UAE चा ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कार्यालयातील कामकाजही पहिले 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे", अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्था डब्ल्यूएएमने दिली आहे.

शेख खलिफा यांनी 2004 मध्ये UAE चे दुसरे राष्ट्राध्यक्ष आणि अबु धाबीचे 16 वा राजा म्हणून शपथ घेतली आणि ते त्यांच्या वडिलांचे उत्तराधिकारी झाले. 
 
त्यांचे बंधू आणि अबू धाबीचा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद यांना आता पुढील काही वर्षांसाठी UAE चा नैसर्गिक शासक असल्याचे मानलं जातंय.