रक्षक भक्षक झाला, आणि 17 महिन्याच्या मुलीचे लचके तोडले

अखेर त्याने तिचे लचके तोडलेच, घरात आल्यापासून त्याची 17 महिन्याच्या चिमुरडीवर नजर  

Updated: Mar 24, 2022, 05:54 PM IST
रक्षक भक्षक झाला, आणि 17 महिन्याच्या मुलीचे लचके तोडले title=

लंडन : कुटुंबाने घराचं रक्षण करण्यासाठी एक श्वान घरी आणलं. पण एक दिवस असा आला जेव्हा तो रक्षकचं भक्षक झाला. एका कुटुंबाने आठवड्यापूर्वी श्वानाला घराचं रक्षण करण्यासाठी खरेदी केलं. पण त्यांना कल्पना नव्हती ज्याला कुटुंबाचं रक्षणासाठी बोलावलं, तोचं त्या कुटुंबासाठी काळ म्हणून आला. 

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, घराच्या रक्षणासाठी आणलेल्या श्वानाने 17 वर्षांच्या मुलीचे लचके तोडले. कुटुंबाने ज्या श्वानाला खरेदी केलं त्याची नजर 17 महिन्यांच्या चिमुरडीवर होती. 

अखेर त्याने रे बर्च नावाच्या चिमुरडीचा चावा घेतला आणि त्यानंतर तिचे लचके तोडून मांस खाल्ले. जेव्हा चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज कुटुंबाने ऐकला तोपर्यंत फार उशीर झाला. 

चिमुरडीला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर तिला वाचविण्यासाठी कुटुंबातील सदस्य जवळ आले. पण श्वानाने अनेकांना जखमी केलं. चिमुरडी जखमी झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ज्याला मुलांसाठी आणि घराच्या रक्षणासाठी आणलं त्यानेचं कुटुंबाला मोठं दुःख दिलं... असं वक्तव्य चिमुरडीच्या वडिलांनी केली आहे.