Lockdown : पृथ्वीच्या पृष्ठभागाचा थरथराट लक्षणीयरित्या कमी

वाचा सविस्तर वृत्त 

Updated: Apr 6, 2020, 08:38 AM IST
Lockdown : पृथ्वीच्या पृष्ठभागाचा थरथराट लक्षणीयरित्या कमी
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली :  CoronaVirus जगभरात सुरु असणारं कोरोना व्हायरसचं थैमान पाहता या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी म्हणून अनेक राष्ट्रांनी महत्त्वाची पावलं उचलली. यापैकीच सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय ठरला तो म्हणजे लॉकडाऊनचा. 

कोट्यवधींच्या संख्येने लोकसंख्या सध्या आपआपल्या घरात किंवा आणखी कोणत्या ठिकाणी बंधिस्त आहे. अर्थात हा बंधिस्तपणा एका विषाणूवर मात करण्यासाठी सर्वांनीच स्वत:हून स्वीकारला आहे. जगभरात अनेक ठिकाणी लागू असणारं हे लॉकडाऊन पाहता आता याचे थेट परिणाम हे पर्यावरण आणि या पृथ्वीवर दिसून येऊ लागले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच पृथ्वीवर असणाऱ्या ओझोन वायूच्या थराला असणारं छिद्र भरून निघत असल्याची माहिती समोर आली होती. निरिक्षण आणि अभ्यासकांनी हे दिलासादायक वृत्त असल्याचं सांगितलं. त्यामागोमागच आता पृथ्वीच्या पृष्ठभागातील थराचा थरथराट कमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. 'सीबीएस न्यूज'ने पृथ्वीच्या हालचालींचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचा हवाला देत याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं. 

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मानवी कृतींमध्ये आलेल्या या अल्पविरामामुळे हे सारं घडत आहे. तातत्पुरची वाहतूक बंदी, व्यापार बंदी आणि बऱ्याच मानवी कृती, हालचाली ठप्प झाल्यामुळे पृथ्वीच्या सर्वात वरच्या थराचं होणारं कंपन लक्षणीयरित्या कमी झालं आहे. 

 

हे कंपन किंवा हा थरथराट कमी झाल्यामुळे आता सर्वाधिक कमी तीव्रतेच्या भूकंपांचं मापन आणि निरिक्षण करणं, ज्वालामुखीची हालचाल पाहण संशोधकांसाठी सोपं झालं आहे. हा बदल तात्पुरता असला तरीही तो फायद्याचा ठरत असल्याचं महतहीअनेकांनी मांडलं आहे.