न्यूज चॅनलचा LIVE कार्यक्रम सुरु असताना आला भूकंप, अशी होती अँकरची प्रतिक्रिया

इराण-इराक सीमा भागात रविवारी रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपात मृतकांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला मृतकांचा आकडा १३० होता तो आता वाढून १६४ झाला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 13, 2017, 04:19 PM IST
न्यूज चॅनलचा LIVE कार्यक्रम सुरु असताना आला भूकंप, अशी होती अँकरची प्रतिक्रिया title=
Image: Video Grab

नवी दिल्ली : इराण-इराक सीमा भागात रविवारी रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपात मृतकांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला मृतकांचा आकडा १३० होता तो आता वाढून १६४ झाला आहे.

मृतकांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच भूकंपादरम्यान कॅमेऱ्यात कैद झालेले व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

या व्हिडिओजमध्ये एक व्हिडिओ रिपोर्टे इंडिगोचा आहे. या न्यूज चॅनलद्वारे ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत न्यूज अँकर Live अँकरिंग करताना दिसत आहे आणि त्याच दरम्यान भूकंप येतो.

५७ सेकंदांच्या या व्हिडिओत दिसत आहे की, न्यूज चॅनलचा अँकर एखाद्या बातमीवर भाष्य करत आहे. काही सेकंदांमध्येच त्याचा टेबल अचानक हलण्यास सुरुवात होते.

सुरुवातीला नेमकं काय झालं हे अँकरच्या लक्षातच आलं नाही. मात्र, नंतर झटके आणखीनच वाढले त्यामुळे अँकर घाबरला. अँकर ज्या व्यक्तीसोबत चर्चा करत होता त्याने ती चर्चा तात्काळ थांबवली.

व्हिडिओत भूकंपाच्या झटक्यांमुळे इमारतीला जोरदार झटके बसत होते त्यामुळे अँकरच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत आहे. लाईव्ह दरम्यान अँकरचा आवाजातही भीती पहायला मिळते.

भूकंपाच्या दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

भूकंपाच्या झटक्यांमुळे नागरिक घाबरुन घरांबाहेर निघून रस्त्यावर आले.