नवी दिल्ली : सध्या मोबाईल अॅडिक्ट आणि प्रत्येक क्षण मोबाईलमध्ये टिपण्याचं वेड खूप आहे. त्यामुळे जिथे जाईल तिथे मोबाईलमध्ये फोटो काढण्यावर जास्त भर दिला जातो. मात्र फोटो काढणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. या तरुणीला हत्तीनं जी शिक्षा दिली तो क्षण ती कधीच विसरू शकणार नाही.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीला पाहण्यासाठी काही तरुणी आल्या आहेत. एक तरुणी हत्तीच्या सोंडेवर हात फिरवत आहे. तर दुसरी तरुणी फोटो काढण्यात मग्न आहे.
हत्तीला मात्र आपला फोटो काढलेला आवडत नाही. तो संतापतो आणि खाडकन सोंडेन तरुणीच्या थोबाडीत लावून देतो. तरुणीच्या हातून मोबाईल पडतो. दोन सेकंद आपल्यासोबत काय घडलं हे तिला कळतच नाही. हत्तीला त्याचा फोटो काढलेला आवडला नाही. त्यामुळे तो असा वागला असं सांगितलं जात आहे.
Fact: Elephants don’t give a sh*t about your Wordle score. #FailArmy
.
.#nature #funny #fail #elephant pic.twitter.com/NHSqqcDpcD— FailArmy (@failarmy) May 22, 2022
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2019 चा असल्याचीही चर्चा आहे. झी 24 तासने या व्हिडीओची खातरजमा केली नाही. या व्हिडीओवर युजर्सनी खूप कमेंट्स केल्या आहेत. हत्तीला असं कधीच पाहिलं नाही असंही एक युजर म्हणाला. तर दुसरा युजर म्हणाला की हत्तीनं मारलेली थोबाडीत महिला आयुष्यभर विसरणार नाही.