एकट्या नवऱ्याचा घरात 'नको तो उद्योग', कॅमेऱ्यात कैद झाला Kissing Scene

...पण नवरा आजारी असल्याने तिला या फॅमिली ट्रिपवर एकटीलाच जावं लागलं.  जेव्हा बायको घरी येते आणि ती सहजच सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहिते तेव्हा तिला मोठ्या धक्का बसतो. 

Updated: Oct 4, 2022, 04:46 PM IST
एकट्या नवऱ्याचा घरात 'नको तो उद्योग', कॅमेऱ्यात कैद झाला Kissing Scene title=
Extramarital affair woman catches husband kissing another woman on cctv nmp

Extramarital affair: नवरा-बायकोमधील (Husband wife) नातं खूप विश्वासच असतं. यात जेव्हा तिसरं कोणी येतं त्या नात्याला तडा जातो. आपण प्रत्येक वेळी एकमेकांवर लक्ष ठेवून नसतो. तरीदेखील नवरा-बायकोला एकमेकांवर पूर्णपणे विश्वास ठेवावा लागतो. आपण जर कुठे गेलो तर आपल्या पाठीमागे नवरा किंवा बायको काय करत असेल त्याची अनेकांना कल्पना नसते. पण जेव्हा त्यांचं पितळ उघड पडतं तेव्हा हा आयुष्यातील खूप मोठा धक्का असतो. (Extramarital affair woman catches husband kissing another woman on cctv nmp)

गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) ठेवण्याचे प्रमाण वाढलेले दिसतं आहेत. यामागील कारण हे प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. पण जेव्हा असे विवाहबाह्य संबंध जगासमोर  (Cheating in Relationship) येतात, तेव्हा विश्वासाला तडा जातो. असंच एक प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. 

एका महिलाने फॅमिली ट्रिपचं (family trip) नियोजन केलं. पण नवरा आजारी असल्याने तिला या फॅमिली ट्रिपवर एकटीलाच जावं लागलं.  जेव्हा बायको घरी येते आणि ती सहजच सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहिते तेव्हा तिला मोठ्या धक्का बसतो. 

बायको घरात नसताना या एकट्या नवऱ्याने नको ते उद्योग करायला घेतले. झालं असं की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिनं पाहिलं की तिचा नवरा घरातील मुख्य दरवाजासमोरील एका छोट्याशा बाल्कनीत दिसत आहे. बाल्कनीतून तो खाली पाहत असतो, इतक्यात त्याच्या मागून एक महिला येते. दोघंही तिथं बराच वेळ एकमेकांना किस करतात. 

डेली स्टारच्या वेबसाईटनुसार महिलेने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर (TikTok account) हा व्हिडीओ (Video) पोस्ट केला आहे. गंमत म्हणजे दरवाजावरील हा सीसीटीव्ही कॅमेरा (Door Camera Record) तिच्या नवऱ्यानेच लावला होता आणि याच कॅमेऱ्यात त्याचा प्रताप कैद झाला.