गुगल एकीकडे Work From Home करणाऱ्यांचे पगार कापायला निघालं तर फेसबुक भरभरून देतंय

कोरोनाचा धोका वाढत असताना Work From Home कर्मचाऱ्यांना फेसबुक तारतंय तर गुगल मारतंय

Updated: Aug 13, 2021, 07:17 PM IST
गुगल एकीकडे Work From Home करणाऱ्यांचे पगार कापायला निघालं तर फेसबुक भरभरून देतंय title=

नवी दिल्ली: जगात कोरोनाचं थैमान अजूनही कायम आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट कहर करत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. एकीकडे मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांचे 25 टक्के पगार कापत असताना फेसबुक सारखी कंपनी मात्र भरभरून कर्मचाऱ्यांना देत आहे. गुगल एकीकडे काही कर्मचाऱ्यांचे पगार कापण्याच्या तयारीत असताना फेसबुक मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना भरभरून देत आहे. 

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन फेसबुकने वर्क फ्रॉम होमचा कालावधी कर्मचाऱ्यांना वाढवून दिला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढच्या वर्षाची सुरुवात कर्मचारी वर्क फ्रॉम होमने करणार आहेत. यासंदर्भात फेसबुकने एक निवेदन जाहीर केलं आहे. यामध्ये फेसबुक आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन वर्क फ्रॉम होम वाढवून देत असल्याचं म्हटलं आहे.

डेल्टा व्हेरिएन्टचे रुग्ण वेगानं वाढत असल्यानं फेसबुकने आपल्या वर्क फ्रॉम होम टार्गेट वाढवून दिलं आहे. फेसबुकने कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि त्यांना टार्गेटही ठरवून देण्यात आलं होतं. मात्र आता फेसबुकने डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढल्याने फेसबुकला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. 

फेसबुकच्या प्रवक्त्या नेनेका नॉरविले यांनी एक निवेदन जारी केलं. 'कंपनीला पुन्हा  कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामासाठी बोलवायचं आहे पण कोरोनाच्या डेल्टा संसर्गामुळे प्रकरणांमुळे हे सध्या शक्य नाही.' ते म्हणाले, "आम्ही सातत्याने परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत, तज्ज्ञांच्या संपर्कातही आहोत." ते म्हणाले की आमचे प्रथम प्राधान्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणं आहे.

याशिवाय वर्क फ्रॉम होम करण्यासाठी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन 1000 डॉलरची मदत करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे फेसबुकच्या साधारण 48000 वर्क फ्रॉम होम गेल्यावर्षी देण्यात आलं होतं. तर 50 टक्के कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी वर्क फ्रॉम होम देण्याच्या निर्णयावर फेसबुक विचार करत आहे.