Fact Check : पेंग्विन जगातून नामशेष होणार?

पेंग्विन (Penguins) जगातून नष्ट होणार हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 

Updated: Nov 1, 2022, 10:11 PM IST
Fact Check : पेंग्विन जगातून नामशेष होणार? title=

Viral Polkhol : बातमी आहे एका (Viral Messege) व्हायरल मेसेजची. पेंग्विन (Penguins) या जगातून नामशेष होणार आहेत. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण, होय पेंग्विन सध्या संकटात असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहुयात. (fact check viral polkhol penguins will be extinct from world know what true what false)

पेंग्विन जगातून नष्ट होणार हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पण, पेंग्विनचा जीव धोक्यात आहे. कारण या जगात पेंग्विनचा जीव गुदमरतोय. अशा आशयाचा मेसेज व्हायरल होतोय. पण, जगातील सर्वच पेंग्विनला धोका आहे का? त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी सुरू केली. याची पडताळणी करताना अमेरिकेतील सरकारने यूएस लुप्तप्राय प्रजाती कायद्यानुसार पेंग्विनला सुरक्षित करण्याचे आदेश दिल्याचं समोर आलं. 

ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकातील बर्फ वितळत असल्याने पेंग्विनचा जीव धोक्यात आलाय. वाईल्ड लाईफ एजन्सीच्या माहितीनुसार, मागील 40 वर्षात सेटेलाईट डेटा आणि रेकॉर्डनुसार पेंग्विनला भविष्यात धोका नाही. पण, हे सगळं काय होतंय पाहुयात.

व्हायरल पोलखोल

हवामान बदलामुळे पेंग्विन संकटात आहे. तापमान वाढीमुळे बर्फ वेगानं वितळतोय. बर्फ वितळत असल्याने पेंग्विनचा जीव धोक्यात आहे. हवामान बदलाचा पेंग्विनच्या प्रजननावर परिणाम होतोय.

ग्लोबल वॉर्मिंगचा फटका पेंग्विनला बसतोय. भविष्यात हा फटका माणसांनाही बसू शकतो. त्यामुळे  प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पर्यावरणाचं संवर्धन करण्याची गरज आहे. अन्यथा पेंग्विनवरील संकट उद्या आपल्यावरही आल्याशिवाय राहणार नाही.