अमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलमधून बाहेर पडताच तालिबानचा गोळीबार आणि आतिशबाजीने जल्लोष

Kabul Airport : तालिबानच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला. ( Situation in Afghanistan) आता देशावर पूर्णपणे तालिबानची राज्यवट लागू झाली आहे. ( Afghanistan Updates)  

Updated: Aug 31, 2021, 10:36 AM IST
अमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलमधून बाहेर पडताच तालिबानचा गोळीबार आणि आतिशबाजीने जल्लोष title=

काबूल :  Kabul Airport : तालिबानच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला. ( Situation in Afghanistan) आता देशावर पूर्णपणे तालिबानची राज्यवट लागू झाली आहे. ( Afghanistan Updates) अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने सोमवारी उड्डाण घेतल्यानंतर तालिबान दहशतवादी काबूल विमानतळावर शिरले आणि हवेत गोळीबार करून स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला. या दरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार फटाकेही उडवले. शेवटच्या उड्डाणासह, अमेरिकेची फगाणिस्तानातील 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपुष्टात आली.

Interpreters who helped the armed forces over the last 20 years stranded behind Taliban checkpoints

अमेरिकेचे तालिबानसोबतच गेल्या 20 वर्षांपासूनचे युद्ध संपले आहे. अमेरिकन सेना 19 वर्ष, 10 महिने आणि 10 दिवसांनंतर अफगाणिस्तानातून बाहेर पडले आहे. बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानावर वर्चस्व मिळवणाऱ्या तालिबानने 'स्वातंत्र्योत्सव' साजरा केला आहे. शेवटचे अमेरिकन विमान काबूल विमानतळावरुन उड्डाण करताच बाहेर तालिबान दहशतवादी आत आले, असे 'डेली मेल'ने म्हटले आहे. त्यांनी उत्सव साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि फटाके फोडले. अफगाणिस्तानचे आकाश रंगीबेरंगी प्रकाशात न्हाऊन निघाले होते. मात्र, सामान्य अफगाणांची भीती वाढली आहे. कारण आता देश पूर्णपणे तालिबानच्या हातात गेला आहे.

Britain and America officially ended their military presence in Afghanistan

अमेरिकन लष्कराने काबूलमध्ये काही हेलिकॉप्टर आणि विमाने सोडली आहेत. तालिबान दहशतवाद्यांनी या विमानांची तपासणी करताना दिसले. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तालिबान अमेरिकन सैन्याने निघून गेल्याने आनंदाने वेडा झाला. ते गोळ्या झाडत विमानतळावर दाखल झाले आणि मुलांप्रमाणेच अमेरिकन लष्कराने सोडलेल्या विमानांवर बसलेल्या छायाचित्रांसाठी पोझ देत राहिले.

Kabul Airport looks a lot different now

तालिबानने विदेशी सैनिकांसाठी  31 ऑगस्ट या तारखेची मुदत निश्चित केली होती. ब्रिटनने रविवारी आपली बचाव मोहीम संपवली आणि अमेरिकेने सोमवारी अफगाणिस्तान देश सोडला. तथापि, अमेरिका आणि ब्रिटनला मदत करणारे शेकडो अफगाणी अजूनही अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. ब्रिटनने अशा सुमारे 1000 अफगाणांना सोडले आहे. या व्यतिरिक्त, सुमारे 200 अमेरिकन अजूनही अफगाणिस्तानमध्ये आहेत.

Just minutes after the last US flight made its way out of Afghanistan, Taliban fighters entered the airport

काबूल विमानतळाचे दृश्य पूर्णपणे बदलले आहे. जिथे कालपर्यंत अमेरिकन आणि ब्रिटीश सैन्य उपस्थित होते, आज तिथे तालिबान तैनात आहेत. सामान्य अफगाण लोकांचा जमावही विमानतळावरून बाहेर पडला आहे. तालिबान आधीच लोकांना देश सोडण्यापासून रोखले होते. आता लोकांना तिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. तथापि, अमेरिकेने अफगाणिस्तानच्या मित्र राष्ट्रांना बाहेर पडण्यास मदत होईल, असे म्हटले आहे, परंतु ते अशक्य वाटते.

Taliban gunmen lit up the night sky over Kabul

अमेरिका सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी सांगितले की, सोमवारी रात्री अमेरिकेचे शेवटचे विमान काबूलमधून उड्डाण केले. ते म्हणाले, 'आम्ही तिथून अनेक लोकांना बाहेर काढू शकलो नाही, त्याचे दु:ख नेहमीच राहील. जर आम्हाला आणखी 10 दिवस मिळाले असते तर आम्ही सर्वांना अफगाणिस्तानातून बाहेर आणले असते. त्याचवेळी, विमानतळाबाहेर उपस्थित असलेल्या तालिबानला कळले की शेवटचे यूएस विमान देखील गेले आहे, ते एक क्षणही न गमावता आत शिरले.

तालिबान दहशतवाद्यांनी प्रथम विमानतळावर उपस्थित असलेल्या अमेरिकन सैन्याच्या विमानांची तपासणी केली, नंतर आनंद व्यक्त करण्यासाठी गोळीबार सुरू केला. बराच काळ, संपूर्ण काबूलमध्ये तोफगोळ्यांचा आवाज घुमला. एवढेच नव्हे तर दहशतवाद्यांनी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांचाही जोरदार वापर केला.