'या' देशात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.   

Updated: Nov 16, 2020, 06:24 PM IST
'या' देशात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

मंगोलिया : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात काही अंशी कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर जानेवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता देखील प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. इतकचं नाही काही राष्ट्रांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे प्रत्येक देश या महामारी तोडगा काढण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, मंगोलिया (Mongolia) देशाने पहिला कोरोना रुग्ण समोर येताच गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून राष्ट्रीय लॉकडाउन लागू केले.

सिन्हुआ न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, कोविड पॉझिटिव्ह रुग्ण ही २९ वर्षीय संक्रमित मंगोलियन परिवहन चालकाची पत्नी आहे. ६ नोव्हेंबर रोजी २१ दिवसांची आयसोलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चालक अल्तानबुलाग सीमारेष मार्गे रूसहून घरी परतला. त्यानंतर चाचणी केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं.

देशाचे उपपंतप्रधान यांगू सोदबातार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती मिळवण्यासाठी लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही असं ते म्हणाले.