अंतराळातही चीनला झटका, एका मिनिटातंच रॉकेटचा स्फोट

चीनला आणखी एक फटका 

Updated: Jul 11, 2020, 09:46 AM IST
अंतराळातही चीनला झटका, एका मिनिटातंच रॉकेटचा स्फोट title=

मुंबई : चीनला सगळ्याच बाजूने झटका बसत आहे. गलवानवर भारताने तर दक्षिण चीनवर अमेरिकेने हल्ला केला. आता चीनला अंतराळात मोठा झटका बसला आहे. चीनला यामुळे करोडोंच नुकसान झालं आहे. चीनचं एक रॅकेट फक्त एका मिनिटांतच प्रक्षेपण फाटलं गेलं. यामुळे चीनचे दोन सॅटेलाईट देखील नष्ट झाले. एक सॅटेलाइट व्हिडिओ शेअरिंग साइटकरता होता. दुसरा नेविगेशन सिस्टमकरता व्हिडिओ तयार करण्यात आला होता. 

चीनने गुरूवारी रात्री १२ वाजून १७ मिनिटांनी उत्तर-पश्चिम चीनच्या जिउकुआ सॅटेलाइट सेंटर ते कुआईओउ-११ रॅाकेट (Kuaizhou-11, KZ-11) लाँच केलं. या रॉकेटमध्ये दोन सॅटेलाइट होते. एक व्हिडिओ शेअरिंग साइट करता बनवण्यात आलं होतं. तर दुसरं नेविगेशन करता. 

बिलिबिलि व्हिडिओ शेअरिंग साइटसोबत चांगगुआंग सॅटेलाइट कंपनी लिमिटेडने सॅटेलाइट तयार केलं होतं. चांगगुआंग सॅटेलाइट कंपनी सरकारी संस्था चांगचुन इंस्टीट्युट ऑफ ऑप्टिक्स, फाइल मॅकेनिक्स आणि फिजिक्सचा हिस्सा आहे. ही चायनीज, एकॅडमी ऑफ साइंसेजच्या अंतर्गत आहे. 

दुसरं सॅटेलाइट म्हणजे सेंटीस्पेस-१-एस२ (CentiSpace-1-02) सॅटेलाइट देखील नष्ट झालं. याला विली१-०२ (Weili-1-02) सॅटेलाइट देखील म्हटलं जातं. हे एक अर्थ ऑर्बिट नेविगेशन सॅटेलाइट होतं. हे संचाराकरता होत आणि बीजिंग फ्यूचर नेविगेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडने तयार केलं होतं. 

कुआईझोड-११ हे रॉकेट प्रोजेक्ट २०१८ मध्ये सुरू केलं होकं. २०१९ मध्ये या रॉकेटचं अगदी पहिल्या प्रक्षेपणातच स्फोट झाला. चीनचं यंदाच १९ वं लाँच झालं. जे अतिशय वाईट पद्धतीने फसलं आहे.