बाली बेट तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पर्यटकांसाठी खुले

इंडोनेशियातील बालीचे पर्यटकांसाठी आकर्षाचे केंद्रबिंदू असलेले बेट गुरुवारी तीन महिन्यांच्या व्हायरस लॉकडाऊननंतर पुन्हा खुले करण्यात आले आहे. 

Updated: Jul 10, 2020, 01:40 PM IST
बाली बेट तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पर्यटकांसाठी खुले

बाली : इंडोनेशियातील बालीचे (Indonesia’s resort island of Bali) पर्यटकांसाठी आकर्षाचे केंद्रबिंदू असलेले बेट गुरुवारी तीन महिन्यांच्या व्हायरस लॉकडाऊननंतर पुन्हा खुले करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक लोक आणि अडकलेल्या परदेशी पर्यटकांना सप्टेंबरमध्ये मायदेशी परतता येणार आहे. तसेच त्यांच्या जाण्याचा हालचालीला आता वेग येणार आहे. 

एप्रिलच्या सुरुवातीला आग्नेय आशियाई बेटातील किनारे आणि रस्त्यास कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक निर्बंध होते. त्यामुळे अनेक लोक बाली बेटावर अडकले होते. तसेच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद होते. त्यामुळे अनेकांचे परतीचे मार्ग बंद झाले होते. विमानतळ बंद केले ४ लाखांहून अधिक लोकांची घरे असलेल्या या बेटावरील सर्व दुकाने, बार, सिट-डाउन रेस्टॉरंट्स, सार्वजनिक जलतरण तलाव आणि इतर अनेक ठिकाणी बंद होते.

इंडोनेशियाने बाली बेट गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले केले आहे. मागील तीन आठवड्यात इंडोनेशियात १९७१  बाधित सापडले असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील बहुतांश ठिकाणी सध्या लॉकडाऊनमुळे लागू आहे. बाली बेटावरील हिंदू संस्कृतीकडे विदेशी पर्यटकांचा ओढा दिसून येतो. सद्यकाळातही विदेशी पर्यटक बाली येथे वास्तव्यास आहेत.