Viral Video : प्रियकराला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली...

Trending Video : हो, प्रियकर आणि बहिणीला एकत्र पाहिलं म्हणून तिने प्रियकराला भरपावसात घराबाहेर काढून दिलं. त्याने तिला आपली चूक विचारलं तर ती म्हणाली तू माझी फसवणूक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 30, 2023, 02:10 PM IST
Viral Video : प्रियकराला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली... title=
Girl throws boyfriend out in rain for cheating on her with her sister watch viral video trending today

Girlfriend Boyfriend Viral Video : नातं कुठलंही असो बहीण भावाचं, प्रियकर प्रेयसी असो किंवा नवरा बायको. कुठलंही नाती ही विश्वासावर उभी असतात. या विश्वासाला तडा गेला की त्यातील गोडवा हरवून जातो. नवरा बायकोमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली की ते नातं कायमसाठी संपुष्ट्यात येतं. प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत किंवा प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पकडल्या गेल्यावर त्यांचं आयुष्य उद्धवस्त होतं. आपली नात्यात फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर तो व्यक्ती रागाच्या भरात अनेक गोष्टी करतो. (Girl throws boyfriend out in rain for cheating on her with her sister watch viral video trending today)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला धोका दिला आहे. तेही गर्लफ्रेंडच्या बहिणीसोबत तो दिसल्याने तिची मोठी फसवणूक झाली आहे. त्यानंतर तिने बॉयफ्रेंडला भरपावसात घराबाहेर हकलं आहे. त्याचा अंगावर फक्त छोटी पॅन्ट आहे. 

पावसात भिजत असताना तो या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो तिला गर्लफ्रेंडला म्हणतोय मारिया प्लीज बाहेर पाऊस पडतोय मला आत घे, प्लीज ...ती तरुणी खिडकीतून त्याचा व्हिडीओ रेकार्ड करतेय. ती त्याला म्हणते की, नाही तू अक्षरशः घृणास्पद कृत्य केला आहे. हे घे तुझं सामन आणि निघून जा. 

हेसुद्धा वाचा - Viral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा

ती तरुणी त्यानंतर त्याच टी शर्ट खिडकीतून त्याच्या अंगावर फेकते. तो पुन्हा तिला विचारतो, मारिया मी काय चूक केली आहे? मी काही चुकीचं केले नाही. 

त्यावर त्याची गर्लफ्रेंड म्हणते, नाही तू माझी मोठी फसवणूक केली आहे. या आरोपाला उत्तर देताना तो म्हणतो, अग मी तुला स्वप्नात फसवलं ना, त्यावर ती म्हणते हो तेही माझ्या बहिणीसोबत....

तो तरुण तिला ओरडून विचारतो अग मग यात माझी चूक नाही ना...

हेसुद्धा वाचा - VIDEO : बॅचलर पार्टी लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर विचित्र कृत्य, वधूने काय केलं पाहा

आता कळलं तुम्हाला त्याच्या गर्लफ्रेंड त्याला तिच्या बहिणीसोबत रोमान्स करताना स्वप्नात पाहिलं होतं. तरीदेखील ती त्याच्यावर वैतागली आणि त्याला भरपावसात घराबाहेर काढलं. सोशल मीडियावर या व्हिडीओ तुफान प्रतिसाद मिळतोय. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर म्हणजेच X वर पोस्ट करण्यात आला आहे.