लग्नात घातली चक्क सोन्याची टाय आणि बूट

लग्नात घातली चक्क सोन्याची टाय आणि बूट

शैलेश मुसळे | Updated: Apr 17, 2018, 04:36 PM IST
लग्नात घातली चक्क सोन्याची टाय आणि बूट title=

नवी दिल्ली : भारतात आणि आजुबाजुच्या देशांमध्ये सोनं घालण्याची लोकांमध्ये खूप हौस असते. लग्न असो किंवा अजून इतर कोणता कार्यक्रम तरी सोन्याची दागिने आवडीने घातली जतात. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने लग्नात चक्क सोन्याची टाय आणि बूट घातले. हे दृष्य पाहून उपस्थितांना चांगलाच धक्का बसला. सध्या त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानमधील लाहौरमध्ये हाफिज सलमान शाहिद नावाचा हा व्यक्ती आपल्या रिसेप्शनमध्ये सुवर्ण टाय आणि बूट घालून पोहोचला. सोन्याचे काही डायमंड असलेल्या सूट देखील त्याने घातला होता. 63 हजारांचा हा सूट असल्याचं बोललं जातंय तर १७ लाखांचे बूट असल्याची माहिती समोर आली आहे. बुटासाठी ३१ तोळे तर टायसाठी १० तोळे सोनं वापरण्यात आलं आहे.

शाहिद हा एक बिझनेसमॅन आहे. सुरक्षेसाठी त्याने अनेक सुरक्षारक्षक देखील ठेवले होते. लग्नात काही तरी खास करण्याची शाहिदची इच्छा होती.