नवी दिल्ली : डूरंड लाईनवर अफगानिस्तानच्या लोकांनी ५ पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं आहे तर एका सैनिकाला पकडून ठेवलं. पण नंतर या पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह पाकिस्तानला सोपवण्यात आले. मागील आठवड्यात सुरु झालेला हा वाद आता संपला आहे. अफगानिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या घटनेत २ अफगानिस्तानच्या नागरिकांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. पाकिस्ताने सैनिक अफगानिस्तानमध्ये दाखल झाल्याने त्यांना नागरिकांनी ठार केलं.
अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेखा आहे ही डूरंड लाईन. दोन्ही देशांमध्ये 2500 किलोमीटर लांबीची सीमा आहे. सीमेलगत डोंगर भाग अधिक आहे. हा पाकिस्तानचा भाग मानला जातो पण अफगाणिस्तानने ते कधी मान्य केलं नाही. अनेकदा पाकिस्तानचे सैनिक आणि सीमाभागातील स्थानिक लोकांमध्ये वाद होतात. मागच्या वर्षी मे महिन्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गोळीबार झाला होता. ज्यामध्य़े अनेक लोकं मारली गेली होती.