सुखद बातमी! या देशाने कोरोना निर्बंध हटवले; सार्वजनिक ठिकाणी मास्कही बंधनकारक नाही

 इस्राइलमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात आली.  त्यानंतर त्यांचे आयुष्य सुरळीत होत आहे. सरकारने काही निर्बंध हटवत शाळा उघडण्याचे आदेश दिले आहेत.

Updated: Apr 19, 2021, 09:04 AM IST
सुखद बातमी! या देशाने कोरोना निर्बंध हटवले; सार्वजनिक ठिकाणी मास्कही बंधनकारक नाही
representative image

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू आहे. परंतु इस्राइलमध्ये सार्वजनिक ठिकाणी आता मास्क लावणं बंधनकारक नाहीये. त्याचं कारण म्हणजे  इस्राइलमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात आली.  त्यानंतर त्यांचे आयुष्य सुरळीत होत आहे. सरकारने काही निर्बंध हटवत शाळा उघडण्याचे आदेश दिले आहेत.

 
 इस्राइलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असल्याचे नियम रद्द केले आहेत.  तसे पाहता मोठ्या सभांमध्ये मास्क लावणे बंधनकारक आहे. इस्राइलने पूर्ण गतीने आपल्या नागरिकांचे लसीकरण केले आहे. बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
 
 सध्या कोरोना प्रतिबंधक अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत.  गेल्या आठवड्यात इस्राइलने घोषणा केली होती, ते विदेशी पर्यटकांना देखील लस देणे सुरू करणार आहेत.  देशाचे कोरोना प्रतिबंधक अधिकारी नैकमन एशने रविवारी सरकारी रेडिओवरून महत्वाची घोषणा केली.
 
 नैकमन एश यांनी लोकांना सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे गरजेचे नाही. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 6 हजार 331 रुग्णांचे कोरोनाने निधन झाले आहे.
 
 इस्राइलच्या 93 लाख लोकांपैकी 53 टक्के लोकांना फायजर/ बायोएनटेकच्या लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे. इस्राइलने डिसेंबर महिन्यातच लसीकरण सुरू केले होते. त्यानंतर येथे रुग्णांचे गंभीर होण्याचे प्रमाण घटले.