मुंबई : गुडबाय २०१९ नंतर २०२० या नववर्षाच्या स्वागतासाठी गूगलने (Google) एक खास डूडल (Google doodle) साकारले आहे. गूगल नेहमीच एखाद्या दिवसाचे किंवा घटनेचे तसेच जगभरातील महत्त्वाच्या व्यक्तींचे वाढदिवस, सण लक्षात राहावे किंवा आठवण राहावी यासाठी खास डूडल साकारत असते. आज तसेच नव वर्षाच्या ( Hoppy New year 2020) पूर्वसंध्येला खास नवीन वर्षाचे डूडल साकारले आहे.
जगात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. काही तासातच नवीन वर्षाला आरंभ होणार आहे. त्यामुळे जगभरातील लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गूगलनेही एक अनोख्या पद्धतीने डूडल साकारुन ३१ डिसेंबर साजरा केला आहे.
दरम्यान, न्यूझीलंडमध्ये नव्या वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीने तर न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये नागरिकांनी नववर्ष स्वागताला गर्दी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्येही नवीन वर्षाचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
गूगलने नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये हवामानाचा अंदाज दर्शवणारा एक बेडूक दाखवण्यात आलाय. त्याच्याजवळ एक चिमणी बसलेली आहे. तिने टोपी घातली आहे. गूगल डूडलमध्ये जी आतषबाजी दाखवण्यात आली आहे. ती वेगवेगळ्या पाच रंगात म्हणजेच, निळी, लाल, पिवळी, गुलाबी आणि हिरव्या रंगात आहे. एकद नवीन वर्षाचे स्वागत जोरदार कलरफुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील नव वर्ष एकदम कलरफुल असेल हे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.