रद्दीच्या दुकानात मिळाले 60 वर्ष जुने लव्ह लेटर, पण यामुळे अपूर्ण राहिली लव्ह स्टोरी

. 60 वर्षांनंतर भेटलेल्या प्रियकराचे प्रेमपत्र वाचून ती महिला ढसाढसा रडली.

Updated: Nov 6, 2021, 09:16 PM IST
रद्दीच्या दुकानात मिळाले 60 वर्ष जुने लव्ह लेटर, पण यामुळे अपूर्ण राहिली लव्ह स्टोरी title=

वॉशिंग्टन : कधी-कधी अशा घटना खूप वर्षानंतर समोर येतात. ज्याचा कधी कोणी विचारही केलेला नसतो. पण नंतर जेव्हा काही गोष्टी कळतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला तिच्या प्रियकराने 60 वर्षांनंतर पाठवलेले प्रेमपत्र मिळाले आहे. 60 वर्षांनंतर भेटलेल्या प्रियकराचे प्रेमपत्र वाचून ती महिला रडली आणि त्याच्या आठवणीत बुडाली. महिलेचा प्रियकर सैन्यात होता.

रद्दीच्या दुकानात सापडले 'लव्ह लेटर'

द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 28 वर्षीय चेल्सी ब्राउनमुळे महिलेला 60 वर्षांनंतर तिच्या प्रियकराची प्रेमपत्रे मिळाली. वास्तविक चेल्सीला रद्दीच्या दुकानात 60 वर्षे जुनी प्रेमपत्रे सापडली. मग चेल्सीने ठरवले की ती हे प्रेमपत्र ज्या स्त्रीसाठी लिहिले आहे तिच्यापर्यंत पोहोचवेल. प्रेमपत्रात महिलेचे नाव कुकी असे लिहिले होते. त्याचवेळी प्रेमपत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव बॉबी होते.

सोशल मीडियाच्या मदतीने चेल्सीला कुकी टोपणनाव असलेली महिला सापडली. त्यानंतर तिने कुकीच्या चुलत भावाशी संपर्क साधला. चेल्सीने तिला सांगितले की तिला हे प्रेमपत्र कुकीला स्वतःच्या हातांनी द्यायचे आहे. चेल्सीला कुकी शोधणे खूप कठीण झाले कारण प्रेमपत्रावर महिलेचा पत्ता लिहिला नव्हता.

प्रियकराच्या आठवणीत बुडाली स्त्री

चेल्सी ब्राउनने सांगितले की, जेव्हा कुकीला तिचा प्रियकर बॉबीचे 60 वर्षांनंतरचे प्रेमपत्र पाहिले तेव्हा ती भावूक झाली आणि तिच्या बॉयफ्रेंडला मिस करू लागली. कुकी आता तिच्या प्रियकराचे 60 वर्षांचे प्रेमपत्र दिवसातून अनेक वेळा वाचते.

कुकीच्या चुलत भावाने सांगितले की, त्या काळात कुकी एअर होस्टेस होती. तिचा प्रियकर सैन्यात होता. कुकीला तिच्या बॉयफ्रेंडचे प्रेमपत्र कधीच मिळाले नाही, त्यामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही.