हा जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे ट्रॅक

स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात उंच गिर्यारोहण रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 16, 2017, 12:10 PM IST
 हा जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे ट्रॅक title=

झुरिच: स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात उंच गिर्यारोहण रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. हा नवा रेल्वेमार्ग पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.

माहितीनुसार, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १४ वर्षांचा काळ लागला आहे. स्टॉसच्या अल्पाइन रिसॉर्ट येथे सर्वात आधी ही ट्रेन धावली. 

उद्यापासून पर्यटकांसाठी

राष्ट्रपती डोरीस लिउथर्ड यांच्याहस्ते अधिकृतपणे याचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर उद्यापासून म्हणजेच रविवारी  पर्यटकांसाठी ही गाडी  सुरू होणार आहे.

३३८.९६ कोटी रुपये खर्च 

जगातील सर्वात उंच क्लाइंबिंग रेल्वेमार्ग टाकण्यासाठी साधारण ३३८.९६ कोटी रुपये खर्च आल्याचे रेल्वेचे प्रवक्ते इव्हान स्टेनर यांनी सांगितले.

यामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय ११० टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. 

१४ वर्षांचा प्रवास 

२००३ मध्ये या प्रोजेक्टवर काम सुरू झाले. ड्रिलिंग आणि बांधकामात आलेल्या अडथळ्यामुळे हे काम पूर्ण होण्यास १४ वर्षे लागली.

ही गाडी ३६ किमी / ताशी वेगाने धावणार आहे. १७३८ मीटर लांब असलेले हे चढण ट्रॅक ७४३ मीटर उंच आहे.

समुद्रतळापासून ६२१७ फूट उंचावर आहे. स्टुटच्या आधी युरोपमध्ये सर्वात मोठा क्लाइंबिंग रेल्वे मार्ग होता.

प्रवासी सोयीसाठी विशेष लक्ष

सरळ उतार मार्गात प्रवाशांचे संतुलन राखण्यासाठी खास डिझाइनमध्ये डब्बे बनविण्यात आले आहेत.

यामुळे प्रवाशांना स्वत:चे संतुलन राखणे कठीण होणार नाही आणि सहजपणे सरळ उभे राहता किंवा बसता येईल.