घोड्यानं घातली जीन्स, विश्वास बसत नाही तर एकदा हा फोटो पाहाच

जीन्स घालणारा घोडा कधी पाहिलाय? अचानक या घोड्याला जीन्स घालण्याची हौस का आली?

Updated: Jul 21, 2021, 05:08 PM IST
घोड्यानं घातली जीन्स, विश्वास बसत नाही तर एकदा हा फोटो पाहाच

नवी दिल्ली: प्राण्यांना संरक्षण मिळावं किंवा कोणी हौस म्हणून कपडे घालत असतात. आतापर्यंत तुम्ही कुत्रा-मांजर अगदी पक्षालाही कपडे घ्यातल्याचं पाहिलं असेल. पण कल्पना करा घोड्याला कोणी कपडे घातले तर? त्यातही जीन्स जर घोड्याला घातली तर घोडा कसा दिसेल. एक क्षण कल्पना करून तुम्हाला खूप हसू येईल.

सोशल मीडियावर असाच एक विचित्र फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये  घोड्याने जीन्स घातल्याचं दिसत आहे. आपल्या पुढच्या दोन पायांमध्ये त्याने जीन्स घातली आहे. (Horse Wearing Jeans Suspenders) या घोड्याने जीन्स सस्पेंडर्स घातल्याचा फोटो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या जीन्सची लांबी जास्त असल्याने त्याला नीट बसण्यासाठी खालून फोल्ड देखील करण्यात आली आहे. 

बेन वोयटास नावाच्या व्यक्तीनं या घोड्याचा फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन दिलं आहे. त्याने या घोड्याला जीन्स घालण्यामागचं कारणही सांगितलं आहे. बेनच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीनं या घोड्याला ही जीन्स घातली आहे. घोड्याच्या पायाला जखम झाली होती. त्यावर सतत माशा बसत होत्या. तिने घेतलेल्या डॉक्टर डिग्रीचा अत्यंत कुशलपणे वापर या घोड्यावर केला.

घोड्याचा घाव लवकर भरावा आणि त्यावर माशा बसू नयेत म्हणून बेन यांच्या पत्नीनं त्याच्या पायाला ही जीन्स घातली आहे. या फोटोला 7 हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे. तर 64 हजार लोकांनी हा फोटो पाहिला आहे. अनेकांनी या आयडियाचं स्वगत केलं तर काहींनी हस्यास्पद पद्धतीनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.