क्रोएशिया : आपल्याकडे कोणाला घर घ्यायचे झाले, तर लोकांना खूप विचार करावा लागतो. कारण घर घेतले की, लोकांचे अर्ध आयुष्य तर घराचे कर्ज फेडण्यातच निघून जाते. ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जिवनातील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु तुम्हाला सांगितले की, जगात असा एक भाग आहे, जिथे फक्त 12 रुपयांत तुम्ही घर घेऊ शकता? तर तुम्हाला खरं वाटेल? नाही ना? परंतु हे खरं आहे. क्रोएशिया देशाच्या उत्तर भागातील लेग्राड या शहरात घरे चक्कं 12 रुपयांत विकली जात आहे. इतकेच नव्हे तर येथील प्रशासन तुम्हाला नूतनीकरणासाठी ही मदत करणार आहे.
एका मीडिया वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या क्रोएशियामध्ये लग्राड शहरहे दुसऱ्या स्थानावर होते. परंतु सुमारे 100 वर्षांपूर्वी ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य वेगळे झाल्यापासून येथील लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे.
लेग्राड शहराची सीमा हंगेरीला जोडलेली आहे. त्यामुळे लग्राडचे नगराध्यक्ष इव्हान सबोलिक म्हणाले की, आमचे शहर एक सीमेवरील शहर असल्याने येथील लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच कमी वाहतुकीच्या कनेक्टिव्हिटीमुळे येथील लोकं आपले घरे सोडत आहेत. ज्यामुळे लोकांसमोर 12 रुपयात त्यांचे घर विकण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नाही.
लेग्राड शहरात भरपूर प्रमाणात हिरवळ आहे. इथे सर्वत्र जंगल आहे. या शहरात 2 हजार 250 लोकं राहतात. परंतु 70 वर्षांपूर्वी या भागात आजच्यापेक्षा दुप्पट लोकं वास्तव्य करत होते.
येथील मेयरने सांगितले की, येथून नुकतीच एकाचवेळी 19 घरे रिकामी करण्यात आले आहेत आणि या घरांची किंमत जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण येथील एका घराची किंमत फक्त 1 कुना म्हणजेच 12 रुपये आहे. यापैकी आतापर्यंत 17 घरे विकली गेली आहेत.
येथील पालिकेने सांगितले की, येथील काही घरे मोडली आहेत, त्यामळे जर कोणी ते घर घेतले तर पालिका त्यांना घर बांधायला किंवा दुरुस्त करायला मदत करेल. तसेच कोणाला इथे रहायचे असेल, तर त्यांनी किमान 15 वर्षे राहण्याचा करार करावा लागेल. तरच ते येथील प्रशासन त्यांना घर घ्यायला मदत करेल.