Trending News : प्रेमकथा लिहिणाऱ्या एका लेखिकेने एक ऑनलाइन कथा लिहिली, त्या पुस्तकाचं नाव होतं, तुमच्या पतीची हत्या कशी कराल? (How to Murder Your Husband). आता या लेखिकेलाच पतीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
हे प्रकरण अमेरिकेचे आहे. नॅन्सी क्रॅम्प्टन ब्रॉफी असे लेखिकेचे नाव आहे. ती 71 वर्षांच्या आहेत. 7 आठवड्यांच्या खटल्यानंतर तिला पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं आहे.
2018 मध्ये क्रॅम्प्टन ब्रॉफीने 63 वर्षीय पती डॅन ब्रॉफीची गोळ्या घालून हत्या केली होती. तिचा पती ओरेगॉन कुलिनरी इन्स्टिट्यूटमध्ये (Oregon Culinary Institute) काम करत होता. पतीच्या मृत्यूनंतर तिला विम्याचे पैसे मिळणार असल्याने क्रॅम्प्टनने हा खून केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितलं.
हे हत्या प्रकरण चांगलंच गाजलं, कारण पतीच्या खूनाच्या एक वर्ष आधी नॅन्सी ब्रॉफीने एक लेख लिहिला होता. त्याचं शिर्षक होतं, 'तुमच्या पतीची हत्या कशी कराल?' मात्र, त्यांचा लेख पुरावा म्हणून न्यायालयात सादर करू दिला नाही.
हत्येच्या वेळी या जोडप्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. स्वतः नॅन्सी क्रॅम्प्टन यांनीही न्यायालयाला सांगितले की तिने आणि तिच्या पतीने जीवन विमा पॉलिसी घेतली होती. हा त्यांच्या निवृत्ती योजनेचा एक भाग होता.