न्यूयॉर्क : एका संशोधनात समोर आलं आहे की, मलेरियाच्या आजारावर वापरण्यात येणार हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, कोविड-१९ वर प्रभावित नाही. जागतिक साथीच्या रोगाची लढण्यासाठी जगातील अनेक देशांत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर सर्वाधिक केला जात आहे. यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड-19 शी लढण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा उल्लेख 'गेम चेंजर' असा केला आहे. प्रीप्रिंट सर्वर मेडआरएसआयवीने प्रकाशित केलेल्या माहितीमध्ये, अमेरिकेतील अनेक आरोग्य केंद्रांनी कोविड-१९ च्या रूग्णांचे विश्लेषण केले आहे. संशोधकांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एजिथ्रोमायसिनच्या औषधांमध्ये काही संबंध जोडून काढला आहे.
संधोधनकर्त्यांच म्हणणं आहे की, फक्त कानावर पडलेल्या गोष्टीतून कोविड-१९ वर उपचार केले जात आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ११ एप्रिलपर्यंत अमेरिकेत उपचाराकरता दाखल झालेल्या सर्व रूग्णांच्या डेटाच विश्लेषण केलं आहे. यामध्ये ३८६ रूग्णांना वेगवेगळ्या गटात वर्गवारी करून संशोध केलं आहे. यामध्ये काही रूग्णांना फक्त हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन देण्याती आली आहे तर काहींना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एजिथ्रोमायसिन देण्यात आलं आहे.
सुरूवातीच्या संशोधनात असं समोर आलं की, काहींचा मृत्यू झाला तर काहींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. संशोधकांच असं म्हणणं आहे की, अद्याप असा कोणता दावा नाही की, ज्यामध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोविड-१९ च्या संक्रमित रूग्णांच्या मॅकेनिल व्हेंटिलेशनची आवश्यकता कमी करते.