कराची : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचं समर्थन केलंय. दहशतवादी संघटना जमात-उद दावा आणि मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईद याच्याबद्द्ल सहानुभूती दर्शवली आहे.
परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानच्या ARY News सोबत बोलताना म्हणाले की, ‘मला हाफिज सईद खूप पसंत आहे आणि त्याचं संगठन जमात-उद दावाचं समर्थन करतो. इतकेच नाहीतर मी लष्कर-ए-तोयबाचाही समर्थक आहे. आणि मला हेही माहिती आहे की, लष्कर आणि जमात-उद-दावा सुद्धा मला पसंत करतात. मी अनेकदा सईदला भेटलो आहे, असा दावाही त्यांनी केलाय.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती म्हणाले की, ‘आम्ही नेहमीच काश्मीरमध्ये कारवाई आणि भारतीय सेनेला मात देण्याच्या पक्षात राहिलो आहोत. ‘लष्कर’ खूप मोठी सेना आहे आणि भारताने अमेरिकेसोबत मिळून त्यांना दहशतवादी घोषित केले आहे. होय, लष्कर काश्मीरमध्ये सक्रिय आहे’.
I am the biggest supporter of LeT and I know they like me & JuD also likes me: Pervez Musharraf to Pakistan's ARY News, also said 'yes' on being asked if he likes Hafiz Saeed, added that, 'I have met him (Hafiz Saeed)' pic.twitter.com/txxT58oPoU
— ANI (@ANI) November 29, 2017
याआधी परवेझ मुशर्रफ यांनी २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जमात-उद-दावा आणि हाफिज सईदचा हात असण्यावर नकार दिला होता. ते म्हणाले की, ‘मला नाही वाटत की, सईदचा २६/११ च्या हल्ल्यात हात असेल. पाकिस्तानात आम्ही त्याला दहशतवादी नाही म्हणत’.