22 वर्षीय इस्रायली तरुणीची नग्न धिंड काढणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याचं इस्रायलने काय केलं पाहिलं का?

Parade Of Shani Louk Dead Body: 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये या 22 वर्षीय तरुणीला दहशतवाद्यांनी म्युझिक फेस्टीव्हलच्या ठिकाणावरुन ताब्यात घेतलं. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 19, 2023, 08:06 AM IST
22 वर्षीय इस्रायली तरुणीची नग्न धिंड काढणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याचं इस्रायलने काय केलं पाहिलं का? title=
तिला म्युझिक फेस्टीव्हलमधून दहशतवाद्यांनी पकडलं होतं (फोटो - रॉयटर्सवरुन साभार)

Parade Of Shani Louk Dead Body: ऑक्टोबर महिन्यामध्ये 7 तारखेला इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये कशाप्रकारे हिंसाचार केलेला याचं उदाहरण पाहायला मिळालं होतं. इस्रायलमधील गाझा पट्टीला लागून असलेल्या सीमा भागांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसांचाराचं रौद्र रुप या व्हिडीओमधून पाहायला मिळालं होतं. या व्हिडीओमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी  एका जर्मन-इस्रायली मुलीला निर्वस्त्र करुन एका ट्रकमध्ये अगदी दाबून ठेवल्याचं दिसत होतं. घोषणाबाजी करत हे दहशतवादी मोठं काहीतरी केल्याप्रमाणे या मुलीचा मृतदेह शहरभर फिरवत होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. हे भयानक कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचा इस्रायल डिफेन्स फोर्सने खात्मा केला आहे.

नक्की तिच्यासोबत घडलं काय?

हमासच्या दहशतवाद्यांनी ठार केलेल्या या तरुणीचं नाव शानी लाउक असं होतं. शानीची आई रिकार्डा लाउक यांच्या हवाल्याने अमेरिकन पत्रकार रब्बी शुमली यांनी दावा केला आहे की इस्रायलच्या लष्कराने त्या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे ज्याने त्यांच्या मुलीला अगदी जनावारासारखी वागणूक देत हालहाल करुन मारलं. ब्रिटनमधील प्रसिद्ध न्यूज कॉन्ट्रीब्यूटर ऑयल लंडनने आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवर, "आईडीएफने जर्मन-इस्रायली महिला शानी लाउकचा मृतदहे गाझाच्या रस्त्यांवरुन फिरवणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. तिची आई रिकार्डा लाउकने जगप्रसिद्ध पत्रकार रब्बी शुमली यांना ही माहिती दिली. आईडीएफने मला त्या दहशतवाद्याला संपवलं आहे असं सांगितल्याचं शानीची आई म्हणाली आहे," असं पोस्ट केलं आहे. 

सामुहिक बलात्कार आणि हत्या

शानी लाउक ही जर्मनीमध्ये राहणारी टॅटू आर्टिस्ट होती. ती इस्रायलमधील नोवा म्यूझिक फेस्टीव्हलसाठी गेली होती. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करुन स्थानिकांना ओलीस ठेवण्यास सुरुवात केली. त्याचवेळे त्यांना शानी लाउक सापडली. दहशतवाद्यांनी आधी तिचे हातपाय बांधून गाझाला नेलं. तिथे तिच्याबरोबर कथित स्वरुपामध्ये सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. तिची हत्या करुन तिचा मृतदेह नग्नावस्थेत फिरवणाऱ्या टोळीतील दहशतवाद्याचा इस्रायलने खात्मा केला आहे.

मृतदेहावर थुंकले लोक

सामुहिक बलात्कारानंतर शानीच्या देहावरील कपडे काढून तो ट्रकमध्ये टाकून शहरभर फिरवण्यात आला. दहशतवादी आणि गाझामधील सामान्य लोक शानी लाउकच्या मृतदेहावर थुंकत असल्याचंही दिसलं. शानी लाउकची चुलत बहीण तोमासिना वेनट्रॉब लाउक हिने व्हायरल व्हिडीओमधील मृतदेहाच्या पायावर असलेल्या टॅटूच्या आधारे शानी लाउकची ओळख पटवली होती. शानीची कवटी इस्रायली लष्कराला सापडली. यावरुन हत्या केल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी तिचा शिरच्छेद केल्याचं स्पष्ट होतं आहे.