उत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन

अमेरिकी लष्करी तळ गुआमवर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला केला तर त्याला अमेरिकेच्या क्षेत्रात येण्यास केवळ १४ मिनिटं लागतील असं गुआम बेटाच्या सुरक्षा प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 11, 2017, 04:00 PM IST
उत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन title=

वॉशिंग्टन : अमेरिकी लष्करी तळ गुआमवर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला केला तर त्याला अमेरिकेच्या क्षेत्रात येण्यास केवळ १४ मिनिटं लागतील असं गुआम बेटाच्या सुरक्षा प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

पॅसिफिक डेली न्यूज च्या वृत्तानुसार, गुआम बेटाच्या होमलँड सुरक्षा प्रवक्ता जेना गेमिंड यांनी सांगितले की, आपातकालीन परिस्थितीत स्थानिकांना १५ ऑल-हैजर्ड्स अलर्ट वॉर्निंग सिस्टम सायरनच्या माध्यमातून कळविण्यात येईल. 

७ हजार अमेरिकी सैनिक तैनात

उत्तर कोरियाने गुरुवारी सकाळी गुआमजवळ चार अंतरमहाद्वीपीय क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याची योजना घोषित केली. त्यानंतर गेमिंड यांनी ही माहिती दिली आहे. गेमिंड यांनी म्हटलं की, या ठिकाणी ७ हजार अमेरिकी सैनिक तैनात आहेत. आमच्या कार्यालयाला सैन्यदल सूचना देईल आणि नागरिकांपर्यंत मेसेज पाठविण्यासाठी प्रसारमाध्यमांचा उपयोग केला जाईल. 

नंतरचे निर्देश

गेमिंड यांनी सांगितले की, आपातकालीन परिस्थीतीत स्थानिक प्रसारमाध्यम, गावाचे महापौर, सोशल मीडियाचा वापर केला जाईल. तसेच नागरिकांनी सायरन ऐकल्यावर त्यांना पूढील निर्देश समजण्यासाठी स्थानिक मीडिया, रेडिओचा वापर करा असेही आवाहन करण्यात आले आहे. 

गुआमवर हल्ला करण्याची घोषणा

न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अमेरिकन बेट गुआमवर हल्ला करण्याचं म्हटलं आहे. उत्तर कोरिया बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करुन हा हल्ला करु शकतं. उत्तर कोरियन सरकारची न्यूज एजन्सी केसीएनएने कोरियन पीपल्स आर्मी कमांडरच्या हवाल्याने म्हटलं आहे की, गुआमवर हल्ला करण्याची योजना ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीत करण्यात येईल.