भारत-पाकिस्तान यांच्यात मैत्रीसंबंध होणे गरजेचे - इम्रान खान

भारतीय मीडियाने मला व्हिलन बनविले आहे. भारताने एक पाऊल पुढे यावे, आम्ही दोन पावले पुढे येऊ, इम्रान खानची प्रतिक्रिया

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 26, 2018, 11:44 PM IST
भारत-पाकिस्तान यांच्यात मैत्रीसंबंध होणे गरजेचे - इम्रान खान title=

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सत्ता पालट झालाय. ११८ सर्वाधिक जागा जिंकत क्रिकेट मैदान गाजविलेल्या इम्रान खानच्या राजकीय पक्षाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे इम्रान खान पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तान निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना इम्रान खाननं भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणार असल्याचं सांगतिले. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा दोन्ही देशांमध्ये जास्तीत व्यापारी संबंधांवर भर देणार असल्याचं म्हटलेय.

इम्रान खान यांची पत्रकार परिषद त्यांच्या निवासस्थानी झाली. त्यात त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा मांडला. निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पाळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. १९९६ मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली. आता आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. जिनांच्या स्वप्नातील पाकिस्तान प्रत्यक्षात आणायचा आहे. हे माझं स्वप्नं आहे. भारताशी सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहोत. भारत-पाकिस्तान यांच्यातला व्यापार हा दोन्ही देशांसाठी फायद्याचा ठरेल, असे ते म्हणालेत.

पाकिस्तानात आघाडीचे सरकार

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आहेत. पाकिस्तानची संसदीय निवडणूक बुधवारी झाली. तात्काळ मतमोजणीला सुरुवात झाली.  सुरुवातीच्या कलानुसार इम्रान खान यांच्या पीटीआय (पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ) या पक्षाला ११८ जागांसह आघाडी घेतली आहे. आता आलेल्या माहितीनुसार, ४९ टक्के मत केंद्रांवर मोजणी पूर्ण झाली आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाझ (PML-N) दुसऱ्या स्थानावर आहे. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला १३७ जागा मिळणं आवश्यक आहे. इम्रान खान यांच्या पक्षाला ११८ जागा मिळाल्यात. तर सत्तेत असलेला पक्ष आणि नवाज शरीफ यांच्या पक्षाला केवळ ६२ जागा मिळाल्यात. तर बिलावल भुत्तो यांच्या पक्षाला ३९ तर अन्य - ५१ जागा मिळाल्यात. त्यामुळे पाकिस्तानात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे आघाडीचे सरकार येणार आहे.

पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

Imran Khan asks India to take a step forward but puts the Kashmir caveat

-भारतीय मीडियाने मला व्हिलन बनविले आहे
- भारताबरोबरच्या संबंधावर भाष्य, भारताने एक पाऊल पुढे यावे, आम्ही दोन पावले पुढे येऊ
- भारत-पाकिस्तान यांच्यात मैत्रीसंबंध होणे गरजेचे आहे
 - काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे.
- काश्मीरचा मुद्दा महत्वाचा आहे. काश्मीरचा प्रश्न चर्चेतून सुटू शकतो. 
- काश्मीरमध्ये लष्कराचा हस्तक्षेप नको. तेथे चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे.

पक्षीय बलाबल 

इम्रान खान - ११८
नवाज शरीफ - ६२
बिलावल भुत्तो - ३९
अन्य - ५१