पंतप्रधान इमरान यांच्या पूर्व पत्नीने पाकिस्तान सरकारला सुनावलं

इमरान खान यांना पूर्व पत्नीचा मोठा धक्का

Updated: Sep 9, 2018, 04:31 PM IST
पंतप्रधान इमरान यांच्या पूर्व पत्नीने पाकिस्तान सरकारला सुनावलं title=

नवी दिल्ली : पाकिस्तानने दोन अर्थशास्त्रज्ञानांचे राजीनामे घेतल्यानंतर पंतप्रधान इमरान खान यांची पूर्व पत्नी जेमिमा गोल्डस्मिथने पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तान सरकारने अर्थ सल्लागार परिषदेतून (ईएसी) प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आतिफ मियां यांचा अर्ज मागे घेतलं आहे. यानंतर आणखी एका अर्थशास्त्रज्ञाने राजीनामा दिला आहे.

ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या 44 वर्षीय जेमिमाने ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तान सरकारने मियां हे अहमद संप्रदायाचे असल्याने कट्टरतावाद्यांच्या दबावात त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानच्या संविधानात अहमद संप्रदायाला गैर मुस्लीम  घोषित केलं आहे. इस्लामी विचारधारेमध्ये त्यांना खालच्या दर्जाचं मानलं जातं. कट्टरतावादी नेहमी त्यांना लक्ष्य करत असतात. त्यांच्या अनेक धार्मिक स्थळांची तोडफो़ड केली गेली. जगातील 25 युवा अर्थशास्त्रज्ञांनाच्या यादीत मियां हे एकमेव पाकिस्तानी आहेत.