काश्मीर मुद्दा : पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला, भारताने ठणकावले

 संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. 

PTI | Updated: Sep 11, 2019, 09:58 AM IST
काश्मीर मुद्दा : पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला, भारताने ठणकावले  title=

लंडन : जिनिव्हामध्ये काश्मीर मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद म्हणजेच UNHRC मध्ये भारताचे अधिकारी विजय ठाकुर सिंह यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान फक्त खोटेच बोलला आहे. जम्मू काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यात बाहेरच्यांचा हस्तक्षेप मंजूर नाही, अशा शब्दांत भारताचे विजय ठाकुर सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.

जम्मू-काश्मीरचा मुद्दा  संयुक्त राष्ट्रात उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने जोरादार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. पाकिस्तान खोटेनाटे आरोप करत आहे. भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशी पाऊल उचलले आहे, असे विजय ठाकूर सिंह यांनी   सांगितले.

 भारत आपल्या अंतर्गत विषयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही हे भारताने स्पष्ट केले. पाकिस्तान खोटे आरोप करत असून प्रदेशातील जनतेच्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले.

पाकिस्तानची अखेर कबुली

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शेख मेहमूद कुरेशी यांना अखेर उपरती झाली आहे. काश्मीर हे भारतातील राज्य असल्याचं वक्तव्य त्यांनी जिनिव्हामध्ये बोलताना केलं. त्यामुळं काश्मीर हा भारताचा भाग आहे, हे पाकिस्तानी मंत्र्यांनीच मान्य केले आहे.

जम्मू काश्मीर भारताचाच भाग असल्याची कबुली अखेर पाकिस्तानने दिली. शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी अनेक आरोप केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जम्मू काश्मीर भारताचा भाग असल्याचे म्हणालेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, संस्था, एनजीओ यांना भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश का दिला जात नाही?, असा सवाल  केला.