या भारतीयाने बनवला स्वत:चा देश, स्वत:लाच म्हटलं राजा

एका भारतीय युवकाने आपला एक स्वत:चा देश बनवला आहे. उत्तर आफ्रिकेतील 800 चौरस मैल क्षेत्रावर त्याने आपला अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Nov 15, 2017, 02:40 PM IST
या भारतीयाने बनवला स्वत:चा देश, स्वत:लाच म्हटलं राजा

नवी दिल्ली : एका भारतीय युवकाने आपला एक स्वत:चा देश बनवला आहे. उत्तर आफ्रिकेतील 800 चौरस मैल क्षेत्रावर त्याने आपला अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

किंगडम ऑफ दीक्षित

मध्य प्रदेशातील इंदूरमधील सुयश दीक्षित नावाच्या या तरुणाने "किंगडम ऑफ दीक्षित" असं या भागाला नाव दिलं आहे. सुयशने स्वतःला या देशाचा राजा घोषित केलं आहे आणि त्याचे वडील पंतप्रधान असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ही माहिती संयुक्त राष्ट्राला देखील पोहोचवली आहे.

कोणत्याही देशाचा दावा नाही

सुयशने आपला राष्ट्रीय ध्वजही बनवला आहे आणि सर्व माहिती एका फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. इजिप्त आणि सुदान दरम्यान हे क्षेत्र आहे. बीर ताविल असं याचं नाव आहे.

800 चौरस मैलच्या या भागावर कोणत्याही देशाचा कोणताही दावा नाही. 1894 मध्ये ब्रिटीशांनी सीमा उभारल्यानंतर हा जगातील असा भाग आहे ज्यावर कोणत्याही देशाचा दावा नाही.

ही गोष्ट सुयशला देखील माहित असेल. त्यामुळे तेथे पोहोचून त्याने त्याच्यावर आपला दावा केला. सुएशने ही माहिती फेसबुकवर पोस्ट केली आहे.

सुएशने सांगितले आहे की त्याने येथे पोहोचण्यासाठी 319 किलोमीटरचा अंतर पार केला. जेव्हा सुयश इजिप्तमधून बाहेर पडत होता तेव्हा सैन्याने दहशतवादग्रस्तांच्या क्षेत्रामुळे शूट-आऊटचे देखील आदेश दिले होते.

राष्ट्रीय पशु पाल

येथे पोहोचल्यानंतर झाडे लावण्यासाठी बियाणे लावले आणि बाटलीमधून पाणी देखील दिलं. या वाळवंट क्षेत्राचा राष्ट्रीय पशु देखील त्याने निवडला आहे आणि ती आहे पाल.

खरं तर, सुएशला या भागात पाली शिवाय कोणताच पशू दिसला नाही. म्हणून त्याने पालीची निवड केली. असा दावा करणारा सुयश हा पहिला व्यक्ती आहे. 2014 मध्ये एका अमेरिकन व्यक्तीने आपल्या मुलीला उत्तर सुदान राज्याची राजकन्या बनविण्यासाठी या वाळवंटातून प्रवास केला होता.