Afganistan Crisis : काबूलमध्ये अडकलेले भारतीय दहशतीखाली; सरकारकडे मदतीची मागणी

अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय पुन्हा मायदेशी कधी परततील? 

Updated: Aug 17, 2021, 08:04 AM IST
Afganistan Crisis : काबूलमध्ये अडकलेले भारतीय दहशतीखाली;  सरकारकडे मदतीची मागणी title=

मुंबई : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर भारतासह अनेक देशातील नारगिक तेथून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात आहे. पण काबूलमधून बाहेर येण्याचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत, कारण तेथील व्यवयासिक विमान वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. अशात नागरिक स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अनेक संकटांचा सामना करताना दिसत आहे. काबूलमध्ये अडकेल्या भारतीय नागरिकाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने मदतीची मागणी केली आहे. 

'टाइम्स नाउ'ने दिलेल्या माहितीनुसार, काबूलमध्ये अडकलेल्या हजारो लोकांमध्ये गुरू नाईक एक आहेत. जे अफगाणिस्तानातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. नाईक यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'मी एक भारतीय नागरिक आहे. मी अफगाणिस्तानमध्ये अडकलो आहे. मी गेल्या सहा वर्षांपासून काबूलमध्ये एका एनजीओमध्ये काम करत आहे.'

'आम्हाला कल्पना नव्हती इतक्या लवकर परिस्थिती इतकी भयंकर होईल. आम्ही सर्व भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत. भारतीय दूतावासाने जारी केलेल्या अलर्टनुसार, मी 16 ऑगस्टसाठी Kam Air आणि Air Indiaची तिकिटे बुक केली होती, पण विमाणतळ बंद केल्यामुळे दोन्ही उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. आम्ही काबूलमधून आता कसे बाहेर पडू हे समजत नाही.'

नाईक पुढे म्हणाले, 'सध्या कोणतीही उड्डाणे नाहीत, म्हणून आम्हाला माहित नाही की आम्ही आमच्या मायदेशात कधी आणि कसे परत येऊ शकू. 15 ऑगस्टच्या रात्री मी काबूल विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला, कोणत्याही धोक्याशिवाय सकाळी विमानतळावर पोहचू शकेन, पण आता उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत.'

काबूल विमानतळावर गोळीबार होत आहे. हजारोंच्या संख्येने लोक विमानतळावर पोहोचले आहेत. नाईक ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्याच हॉटेलमध्ये अन्य भारतीय देखील आहेत. अशात काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांची मदत करत त्यांना अफगाणिस्तानच्या दहशतीतून बाहेर काढण्याची मागणी गुरू नाईक  यांनी केली आहे.