तालिबानचा क्रूर चेहरा आला जगासमोर, सर्व मर्यादा ओलांडल्या

Situation in Afghanistan :अफगाणिस्तानची राजधानी काबुल  (Kabul) तालिबानच्या हाती गेल्यानंतर अफगाणिस्तान देशातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. 

Updated: Aug 17, 2021, 07:55 AM IST
तालिबानचा क्रूर चेहरा आला जगासमोर, सर्व मर्यादा ओलांडल्या title=

काबूल: Situation in Afghanistan :अफगाणिस्तानची राजधानी काबुल  (Kabul) तालिबानच्या हाती गेल्यानंतर अफगाणिस्तान देशातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. तालिबान बंडखोरांचा  (Talibani Fighters) रोष टाळण्यासाठी अफगाणच्या लोकांनी 15 ऑगस्टपासून काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर  (Kabul International Airport) आश्रय घेतला आहे. अफगाणांची एकच आशा आहे की काही देश त्यांना आश्रय देतील, जेणेकरून त्यांना क्रूर तालिबानच्या तावडीतून मुक्त करता येईल. आज, या आशेने अशी धक्कादायक फोटो समोर आले आहेत. जेव्हा अफगाण नागरिक चालत्या विमानावर चढले आणि नंतर उंचीवरून खाली पडले. यामुळे कमीतकमी 3 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला.

Afghan अध्यक्ष हेलिकॉप्टरमध्ये पैसे कोंबून-कोबून घेऊन पळून गेले, जागेच्या अभावामुळे काही सोडून गेले

गोंधळामुळे लोक काबूल विमानतळावर पोहोचले

काबूलमध्ये प्रवेश केल्यापासून तालिबान सतत दावा करत आहे की ते अहिंसक मार्गाने सत्ता हस्तांतरित करत आहेत. सोमवारी अफगाणिस्तानमध्ये एक आशादायक बातमी हाती आली की, अमेरिका तालिबानने त्रस्त झालेल्या सर्व अफगाणांना आश्रय देईल, त्यानंतर हजारो अफगाण नागरिकांनी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाची सरंक्षक भिंत ओलांडून विमानतळामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

तालिबान्यांची क्रूरता समोर आली

'झी मीडिया'ला असा व्हिडिओ मिळाला आहे, जो या क्रूर तालिबानींचे वास्तव संपूर्ण जगासमोर मांडण्यासाठी पुरेसा आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की जेव्हा एक अफगाणी नागरिक काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाची संरक्षक भिंत ओलांडून विमानतळामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा विमानतळाच्या बाहेर काळ्या कपड्यांमध्ये उपस्थित असलेल्या तालिबानी शस्त्रधारीने  (Talibani Fighter) त्याच्यावर गोळ्या झाडल्या. तो विमानतळाच्या दुसऱ्या बाजूला पडला.

सत्तेवर आल्यानंतर तालिबानचा चेहरा काय असेल?

आतापर्यंत, त्या अफगाणीला गोळी घातल्यानंतरच्या परिस्थितीबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही, परंतु अफगाणिस्तानच्या माध्यमांवर विश्वास ठेवला तर, काबूल विमानतळावर आज गर्दीमुळे किमान 10 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उपस्थित केले जात आहेत की अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा करण्यापूर्वी क्रौर्यापासून परावृत्त न होणारे तालिबान काय करणार, सत्ता काबीज केल्यानंतर निष्पाप अफगाणांचे काय होणार?