1 लीटर कोल्ड ड्रिंक 10 मिनिटात गटकवल्यानं तरुणं गमावला जीव, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

कोल्ड ड्रिंक आवडीने पित असाल तर सावधान!

Updated: Oct 5, 2021, 08:53 PM IST
1 लीटर कोल्ड ड्रिंक 10 मिनिटात गटकवल्यानं तरुणं गमावला जीव, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

बिजींग : जगात असे बरेच लोक आहेत जे, एका कोल्ड ड्रिंकची संपूर्ण बाटली एका श्वासात पिण्याची पैज लावतात किंवा एखाद्या व्यक्तीला तहान लागली असेल तरी ती, व्यक्ती एका दमात संपूर्ण ग्लास किंवा बाटलीतील कोल्ड्रींक संपवतो. परंतु असे करणे थांबवले पाहिजे, तुम्हाला देखील असं करण्याची सवय असेल तर ती आताच थांबवा. खरं तर, चीनमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे कोल्ड ड्रिंक पिऊन एका 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मीडिया अहवालानुसार असे समोर आले आहे की, 22 वर्षीय तरुण 10 मिनिटात दीड लिटर कोल्ड ड्रिंक प्यायला. ज्यामुळे त्याच्या शरीरात गॅसचा असा काही फुगा तयार झाला की, त्याला श्वास घेणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

चीनची ही बातमी सर्वच थंड पेयप्रेमींसाठी धक्कादायक आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, चीनमध्ये सध्या लोकांना उकडत आहे. अशा परिस्थितीत बीजिंगमधील एका मुलाने कोल्ड ड्रिंकची दीड लिटरची बाटली विकत घेतली आणि उष्णतेपासून आराम मिळवा म्हणून दहा मिनिटांत ती पूर्णपणे संपवली.

त्यानंतर त्याच्या शरीरात भरपूर गॅस तयार झाला आणि त्याची स्थिती बिघडू लागली. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.

अहवालानुसार, कोल्ड ड्रिंकची बाटली संपूर्ण प्यायल्यानंतर मुलाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि रक्तदाब कमी होऊ लागला. यासह, त्याला श्वास घेणे देखील कठीण झाले. सहा तासांनंतर त्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण 18 तासांच्या आत त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोल्ड ड्रिंक पटापट प्यायल्याने त्याच्या पोटात गॅस तयार झाला, जो त्याला सहन होत नव्हता आणि त्यामुळे या तरुणाने आपला जीव गमावला.

काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोल्ड ड्रिंक्स वेगाने प्यायल्याने मुलाच्या आतड्यात गॅस तयार झाला होता. याशिवाय पोटाच्या नळीत प्रवेश करणाऱ्या वायूमुळे यकृतातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. ज्यामुळे मुलाला आपला जीव गमवावा लागला. पण लंडन विद्यापीठातील प्राध्यापक नाथन यांचा या सिद्धांतावर विश्वास नाही. कोल्ड ड्रिंक्स पिऊन कोणाचा मृत्यू होणे शक्य नाही असे त्यांचे मत आहे.